दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी — युवासेना पोंभुर्णा
पोंभुर्णा (ता. पोंभुर्णा): तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, हरभरा, धान यांसारख्या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी अवस्थेत असून, आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेना पोंभुर्णा तर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करून तातडीने ‘ओला दुष्काळ’ घोषित करण्याची आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
- सर्व प्रभावित गावांमध्ये तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी.
- पिक विमा योजनेअंतर्गत भरपाई त्वरित वितरित करण्यात यावी.
- बियाणे, खते व औषधे यासाठी विशेष अनुदान जाहीर करण्यात यावे.
- शेती, घर व जनावरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र आर्थिक मदत देण्यात यावी.
- पोंभुर्णा तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
युवासेना शहरप्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांनी सांगितले की,
“पोंभुर्णा तालुक्यातील शेतकरी आज प्रचंड संकटात आहेत. सलग अवकाळी पावसामुळे त्यांच्या पिकांचे व उत्पन्नाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने ‘ओला दुष्काळ’ घोषित करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवावी, हीच आमची मागणी आहे. युवासेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे; प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून लढा उभारू.”
या निवेदनावेळी गोकुळ तोडासे, अक्षय झाडे, कृषभ बुरांडे, सुरज कावळे, साहिल नैताम, नोकेश कपाट, तुषार नैताम, विकास बुरांडे, अक्षय गद्देकार, रूनाल गुरुनुले, रुचित गद्देकार यांच्यासह अनेक युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.




0 टिप्पण्या
Thanks for reading