Advertisement

गावात सुरू असलेल्या विजेच्या लपडवीबाबत ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार


गावात सुरू असलेल्या विजेच्या लपडवीबाबत ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार

एमएसबी कार्यालयात निवेदन सादर – गावकऱ्यांचा संताप व्यक्त
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

घोसरी:- गावातील वीजपुरवठा मागील अनेक दिवसांपासून अत्यंत अस्थिर असून सतत लाइनची लपडव (फ्लक्च्युएशन) सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही वीज विभागाचे अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने गावकऱ्यांचा संताप ओसंडून वाहू लागला आहे.


या पार्श्वभूमीवर आज ग्रामपंचायत सदस्य आकाश वडपल्लीवार यांनी गावकऱ्यांसह महावितरण (MSB) कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात तातडीने दोषपूर्ण लाईन दुरुस्ती करून वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वडपल्लीवार यांनी सांगितले की, “गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. दिवसभरात अनेक वेळा वीज जाते किंवा लपडव होते. त्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या मोटारी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे.”

गावकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरच वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जाईल.

👉 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📺 स्थानिक समस्यांचा आवाज — तुमच्या हक्कासाठी तत्पर!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या