Advertisement

🟩 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP)” चे आभासी उद्घाटन संपन्न 🟨 “कौशल्यविकास हेच भविष्याचे सामर्थ्य — आत्मनिर्भर भारताचा हा नवा टप्पा” — मा. खा. डॉ. अशोकजी नेते

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क



🟩 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP)” चे आभासी उद्घाटन संपन्न
🟨 “कौशल्यविकास हेच भविष्याचे सामर्थ्य — आत्मनिर्भर भारताचा हा नवा टप्पा” — मा. खा. डॉ. अशोकजी नेते

सावली (दि. 9 ऑक्टोबर २०२५):
देशाचे लोकप्रिय आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी आज आभासी पद्धतीने “अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP)” चे उद्घाटन केले. हा भव्य सोहळा सावली–चकपिरंजी (जि. चंद्रपूर) येथील क्रांतीकारी खुदिराम बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत करण्यात आले होते. ग्रामीण तसेच शहरी युवकांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे आणि “आत्मनिर्भर भारत” या ध्येयदृष्टीला गती देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

राष्ट्रीय स्तरावरील या सोहळ्याला राज्यपाल मा. आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार आणि मा. एकनाथ शिंदे यांची मान्यवर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. मंगल प्रभात लोढा (मंत्री – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महाराष्ट्र राज्य) यांनी केले.

स्थानिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार तसेच भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भूषविले.

या प्रसंगी माजी बांधकाम सभापती जि.प. चंद्रपूर संतोषभाऊ तंडपल्लीवार, जिल्हा बँक संचालक रोहितभाऊ बोम्मावार, ज्येष्ठ नेते देवराव मुद्दमवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश गड्डमवार, नगरसेवक व तालुका महामंत्री सतिश बोम्मावार, प्राचार्य विजय दुपारे, माजी जि.प. सदस्या मनिषा चिमुरकर, माजी तालुकाध्यक्ष अर्जुन भोयर, सुरज बोम्मावार, मोतीराम चिमुरकरनिखिल सुरमवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनोगतात डॉ. अशोकजी नेते म्हणाले,

“मी सावली येथे सतिश बोम्मावार यांच्या कार्यालयात असताना या कार्यक्रमाची माहिती मिळाली आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते ‘अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम’ सुरू झाला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”

ते पुढे म्हणाले,

“मी खासदार असताना अतुलभाऊ देशकर यांच्यासह या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट दिली होती. तेव्हा येथे मर्यादित सुविधा होत्या; मात्र आज येथे उभारलेले विशाल बसण्याचे शेड माझ्या प्रयत्नाने झाले, हे पाहून मला समाधान वाटते. संस्थेचा अधिकाधिक विकास व्हावा आणि विद्यार्थी आत्मनिर्भर बनावेत, हीच माझी इच्छा आहे.”

“गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड आणि कोनसरी प्रकल्पांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना रोजगारात प्राधान्य दिले जाते. सावली तालुक्यातील युवकांनीही अशाच प्रकारे प्रशिक्षण घेऊन उद्योगाभिमुख, रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर व्हावे,” असेही डॉ. नेते यांनी नमूद केले.

या STEP उपक्रमाद्वारे अल्पकालीन प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगार व स्वरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील युवकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा हा नवा टप्पा ठरणार आहे.

🟢 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “कौशल्य भारत – सक्षम भारत” या ध्येयदृष्टीला साजेसा असा हा उपक्रम आत्मनिर्भरतेकडे नेणारा महत्त्वाचा पाऊल ठरतो आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या