गंगापूर नवीन येथील शेतकऱ्यांना सातबारा संगणीकृत करून द्यावा – अलका आत्राम
पोंभुर्णा (प्रतिनिधी) : मौजा गंगापूर नवीन येथील शेतजमिनींचे सातबारे अद्याप संगणीकृत न झाल्यामुळे येथील शेतकरी विविध शासकीय योजनांपासून वंचित राहिले आहेत. या गंभीर प्रश्नावर आज अलका आत्राम प्रदेश महामंत्री यांनी शेतकऱ्यांसह मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार बल्लारपूर विधानसभा, यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आमदार मुनगंटीवार यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना गंगापूर नवीन येथील सातबारा संगणीकृत करण्यासंबंधी आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मंडळाने तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे भेट देऊन मा. शेलवटकर सर, तहसीलदार पोंभुर्णा यांना निवेदन सादर केले.
सातबारा संगणीकृत न झाल्यामुळे गंगापूर नवीन येथील शेतकऱ्यांना पिकविमा, शेततळे, सिंचन योजना, वीजसवलत यांसारख्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने तत्काळ संगणिकीकरण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या प्रसंगी अलका आत्राम प्रदेश महामंत्री, नारायण बोन्डे, मोरेश्वर राऊत, सुधाकर शिंदे, धनराज वाकूडकर, गिरीधर खेडेकर, किशोर पुप्पलवार, दिवाकर शिंदे, संजय मराठे, चिंतामणी खेडेकर, निलेश सातरे, केशव शिंदे, रणपती वडस्कर, उमेश सिडाम तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.




0 टिप्पण्या
Thanks for reading