🚩 जनतेच्या सेवेसाठी तत्पर भाजपा – लालहेटीतील २ वर्षांपासूनची समस्या काही तासांत मार्गी
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा लालहेटी येथे मागील दोन वर्षांपासून रखडलेली स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने काही तासात मार्गी लागली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाची लाट पाहायला मिळाली आहे.
काल आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनांनुसार गावभेट आयोजित करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली. पाण्याच्या प्रवाहामुळे पूर्ण रस्ता उखडून खड्डे निर्माण झाल्याने शेतकरी व गावकरी मोठ्या अडचणीतून स्मशानभूमीकडे जात होते.
ग्रामस्थांच्या या ज्वलंत मागणीची तात्काळ दखल घेऊन
आज सकाळी
- भाजपा पोंभुर्णा तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांनी स्वतःची जेसीबी उपलब्ध करून दिली
- भाजयुमो महामंत्री जितू भाऊ चुदरी
- लालहेटीतील कार्यकर्ते व गावकरी
यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्याची दुरुस्ती सुरू केली. खड्डे भरून रस्ता दुरुस्त करून गावकऱ्यांच्या तातडीच्या समस्येवर उपाय करण्यात आला.
गावकऱ्यांनी या कार्याची प्रशंसा करत भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
त्यांच्या म्हणण्यानुसार—
“जनतेच्या सेवेसाठी वर्षभर धावत असलेला कार्यकर्ता फक्त भाजपा मध्येच पाहायला मिळतो.”
जनता के सन्मान मे, हर किसीके काम मे – भाजपा मैदान मे!
🙏🚩



0 टिप्पण्या
Thanks for reading