दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 👇
📌 3 ट्रॅक्टर व 1 जेसीबी जप्त — सावली वनपरिक्षेत्राची धडक कार्यवाही
✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
सावली (ता.२४)
सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड व नियतक्षेत्र सिर्सी अंतर्गत मौजा कढोली परिसरात वनविभागाच्या मालकीच्या जागेतून सुरू असलेल्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत 3 ट्रॅक्टर व 1 जेसीबी अशी एकूण 4 वाहने जप्त करण्यात आली.
वनक्षेत्रात अवैधरित्या माती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर व्याहाड उपक्षेत्रात रात्रकालीन गस्त वाढवण्यात आली होती. यावेळी क्षेत्र सहायक अनंत राखुंडे व वनरक्षक महादेव मुंडे यांनी मौजा कढोली येथील गट क्र. 144 मध्ये व्यावसायिक हेतूने उत्खनन सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहून तत्काळ कारवाई केली.
या प्रकरणात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33(1)(E) व 35(1)(G) नुसार वनगुन्हा क्रमांक 204/232852/2025 नोंदविण्यात आला आहे.
जप्त वाहनांचा तपशील पुढीलप्रमाणे :
1️⃣ मल्लेश नरसय्या मेरफुलवार रा. हरंबा यांची
• जेसीबी (पिवळा रंग) – क्रमांक MH-33/4487
• महिंद्रा B275DI ट्रॅक्टर – MH34/BV-5332 (माती भरलेला) + ट्रॉली (बिनक्रमांक)
2️⃣ सिंदुबाई किसनदेव बोदलकर रा. उपरी यांचे
• स्वराज्य 843XM ट्रॅक्टर (बिनक्रमांक) + ट्रॉली (बिनक्रमांक)
3️⃣ राजेश नामदेव सातपुते रा. उपरी यांचे
• स्वराज्य 735FE ट्रॅक्टर (बिनक्रमांक) + ट्रॉली – चेसिस क्रमांक AL240315824
वन विभागाने तात्काळ वाहन जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.
🌲 कारवाईत सहभागी कर्मचारी
सतिश नागोसे (वनरक्षक, चितेगांव),
रमेश बोनलवार (वनरक्षक, टेकाडी),
सतिश मजोके, बंडू दुधे,
रवि सोनुले, मारोती पिपरे,
नेहरू पाल व PRT चमू सिर्सी
यांनी विशेष योगदान दिले.
ही कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले व सहायक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
📍 (विनोद धुर्वे)
वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सावली




0 टिप्पण्या
Thanks for reading