Advertisement

चकफुटाणा ग्राम पोषण आहार उपक्रमात ‘एक घास मायेचा’ – महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, पौष्टिकतेचा संदेश

 


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चकफुटाणा ग्राम पोषण आहार उपक्रमात ‘एक घास मायेचा’ – महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, पौष्टिकतेचा संदेश

पोंभुर्णा (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायतराज अभियानांतर्गत मौजा चकफुटाणा येथे ग्राम पोषण आहार उपक्रमांतर्गत “एक घास मायेचा” हा विशेष उपक्रम शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कुपोषण निर्मूलनाचा संकल्प आणि महिलांना पोषणाविषयी जागरूकता हा उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

या कार्यक्रमात गावातील महिलांनी पोषणयुक्त पाककृती सादर करत सक्रिय सहभाग नोंदवला. कमलबाई शंभळकर, अश्विनी अर्जुनकर, अनुराधा गौरकर, वनिता मानकर, वैशाली चंदावार, रजनी पिंपळकर, सोनी गौरकर, प्रांजली अर्जुनकर, कांचन पिंपळकर, नंदिनी मेदाळे, काजल रोहनकर, कीर्ती रामगिरकर आणि वर्षा कानमपल्लीवार या महिलांच्या सहभागामुळे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सोनुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अंगणवाडी सेविका माधुरी बोमावार, आशा वर्कर लता रोहनकर यांनी महिलांना पोषणयुक्त पाककृती निर्मिती, कुपोषण प्रतिबंध आणि मातृ-शिशु आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले.

स्पर्धेत निवड झालेल्या महिलांना बक्षीस वितरण करताना सरपंच सौ. जयश्री अर्जुनकर, उपसरपंच गणेश अर्जुनकर, ग्रामपंचायत अधिकारी पी. एम. सरकार यांची उपस्थिती लाभली. तसेच ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट प्रतिनिधी व ग्रामस्थ यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या शेवटी पौष्टिक अल्पोपहार देण्यात आला.

कुपोषणावर मात करण्यासाठी ग्रामस्तरावर अशा उपक्रमांची गरज – महिलांचा एकच सूर!

या निमित्ताने महिलांनी पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावून घेतले आणि दैनंदिन स्वयंपाकात आरोग्यदायी अन्नपदार्थांचा समावेश करण्याचे निर्धार व्यक्त केला. उपक्रमामुळे महिलांमध्ये पोषणाबद्दल जागरूकता वाढली असून कुपोषित बालकांच्या आरोग्यवर्धनास मोठी चालना मिळणार आहे.

— दरारा 24 तास न्यूज नेटवर्क पोंभुर्णा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या