📰 वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
मा. जैनुद्दीन जव्हेरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उबदार उपक्रम — ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम साजरा
बल्लारपूर :- प्रशांत रणदिवे तालुका प्रतिनिधी (ता. ८ नोव्हेंबर) – मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे शाळेचे संस्थाध्यक्ष मा. जैनुद्दीन जव्हेरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीव जपत उबदार उपक्रम राबविण्यात आला. या विशेष दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना तसेच शालेय कर्मचाऱ्यांना ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या असमा खान मॅडम होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपसचिव मा. इब्राहिम जव्हेरी सर, संस्थेचे सभासद सादिक जव्हेरी सर, मा. तसनीम जव्हेरी मॅडम, मा. ढगे मॅडम (विशेष शिक्षक, पंचायत समिती बल्लारपूर) तसेच पत्रकार आर्य उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील बस ड्रायव्हर, कंडक्टर, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि सफाई कामगार यांनाही ब्लॅंकेट देऊन सन्मानित करण्यात आले. एकूण ७५ ब्लॅंकेट्स चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वनिता गुंफेवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती खोके मॅडम यांनी मानले.
या सामाजिक उपक्रमाद्वारे शैक्षणिक संस्थेने समाजातील संवेदनशीलतेचा आणि सेवाभावाचा उत्कृष्ट संदेश दिला.







0 टिप्पण्या
Thanks for reading