Advertisement

बाबराळा ग्रामपंचायत नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

 

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क



बाबराळा ग्रामपंचायत नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

बाबराळा (ता., जि.) – आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत बाबराळा येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

या सोहळ्याचे उद्घाटन इमारतीसाठी जागा दान करणारे आदरणीय श्री. रामचंद्रजी जगन्नाथ ढपकस यांच्या शुभहस्ते रिबीन कापून करण्यात आले. त्यांनी ग्रामविकासासाठी दिलेले योगदान अतिशय मोलाचे असून उपस्थित ग्रामस्थांनी त्यांच्या या उदार कृतीबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी ग्रामपंचायत बाबराळाचे सरपंच श्री. धीरज गोहणे, उपसरपंच सौ. अनिता शरद नाहगमकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. टुमदेव कोरडे, श्री. दशरथ ठाकुर, सौ. सपना गोल्लावार, श्री. जीवनदास मेश्राम आणि सौ. अश्विनी तिवाडे उपस्थित होते.

सोहळ्याला बाबराळा वासिय जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनली. नव्याने उभारण्यात आलेली ग्रामपंचायत इमारत ही गावाच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय ठरेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


संपूर्ण सोहळा एकतेचा, आनंदाचा आणि ग्रामविकासाचा प्रतीक ठरला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या