दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
अजिंक्य प्रकाश पाटील यांची बल्लारपूर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड
बल्लारपूर | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत अजिंक्य प्रकाश पाटील (मारकवार) यांची बल्लारपूर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती माननीय अजित दादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या मान्यतेनुसार करण्यात आली आहे. यानुसार माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब (राज्यमंत्री – उद्योग, उच्च व तंत्र शिक्षण) यांच्या शुभहस्ते अजिंक्य पाटील यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
अजिंक्य प्रकाश पाटील हे युवकांमध्ये लोकप्रिय, सामाजिक कार्यात सक्रिय तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटना अधिक गतिमान होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर बोलताना अजिंक्य पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत,
“युवकांना संघटित करून पक्षाच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार करणे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणे आणि आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार,” अशी ग्वाही दिली.
या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवकांनी अजिंक्य पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क




0 टिप्पण्या
Thanks for reading