दरारा 24 तास न्यूज नेटवर्क :
युवाशक्ती क्रीडा मंडळ, मुल आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी लीग स्पर्धा; 16 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान रंगणार ‘लीगा पंगा’!
मुल (जि. चंद्रपूर) | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळावे तसेच कबड्डी खेळाच्या माध्यमातून एकात्मता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने युवाशक्ती क्रीडा मंडळ, मुल यांच्या वतीने भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
“टेम्पोराडा 37 – लीगा पंगा” या नावाने ही स्पर्धा दि. 16, 17 व 18 जानेवारी 2026 रोजी युवाशक्ती क्रीडा मंडळाच्या भव्य पटांगणावर, मुल येथे पार पडणार आहे.
ही स्पर्धा फक्त ग्रामीण भागासाठी असून “एक गाव – एक संघ” या संकल्पनेवर आधारित आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंचे वजन 60 किलोपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले असून सर्व खेळाडूंनी आधार कार्ड अपडेट असणे अनिवार्य आहे. प्रवेश शुल्क ₹500 असून स्पर्धेची नोंदणी क्रमांक चंद्रपूर 686/2025 आहे.
आकर्षक बक्षिसांची लयलूट
या कबड्डी महोत्सवात विजेत्या व उपविजेत्या संघांसह उत्कृष्ट खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
- प्रथम क्रमांक : ₹51,000/-
मा. श्री. संतोषसिंह रावत, महासचिव, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या शुभहस्ते - द्वितीय क्रमांक : ₹31,000/-
मा. श्री. राकेशभाऊ रत्नावार, सभापती, कृ.उ.बा.स. मुल
मा. श्री. राजेंद्र कन्नमवार, उपसभापती, कृ.उ.बा.स. मुल - तृतीय क्रमांक : ₹21,000/-
मा. सौ. एकता प्रशांत समर्थ, नगराध्यक्ष न.प. मुल
मा. श्री. प्रशांतभाऊ समर्थ, नगरसेवक व माजी बांधकाम सभापती न.प. मुल - चतुर्थ क्रमांक : ₹11,000/-
युवाशक्ती क्रीडा मंडळ पदाधिकारी यांच्याकडून
तसेच सर्वोत्कृष्ट रेडर, सर्वोत्कृष्ट डिफेंडर व सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर यांना प्रत्येकी ₹3,000/- रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
मंडळाची जबाबदारी व पदाधिकारी
या स्पर्धेचे आयोजन युवाशक्ती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री. रूपलसिंह रावत, उपाध्यक्ष श्री. प्रविन चेपुरवार, कोषाध्यक्ष गुलावखाँ पठाण व श्री. चतुर मोहुर्ले, सहसचिव श्री. चंद्रकांत चटारे व श्री. तेजस महाडोळे, क्रीडा प्रमुख श्री. दीपक चुगानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी संपर्क
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क :
- तेजस महाडोळे – 9922733345
- अविनाश चहारे – 7219758495
- 8668925907
- सागर मांडवकर
नियम व अटी
स्पर्धेत प्रो-कबड्डीचे सर्व नियम लागू राहतील. सर्व संघांनी सामना सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक खेळाडू एका संघाकडूनच खेळू शकतो. नशेत आढळल्यास संघ बाद करण्यात येईल. दंगाधोपा करणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाईल. आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य असून, नियमभंग झाल्यास संघ बाद करण्यात येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामीण युवकांच्या क्रीडाशक्तीला नवे व्यासपीठ देणारी ही कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह रावत, चेतन नंदाराम, प्रविण खानोरकर, विजय कामनपल्लीवार तसेच संपूर्ण युवाशक्ती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.





0 टिप्पण्या
Thanks for reading