दरारा 24 तास 👇
कोण कुठे करणार ध्वजवंदन?
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी राज्यभर एकाच वेळी मुख्य शासकीय समारंभ
पालकमंत्री व मंत्र्यांकडे जिल्हानिहाय ध्वजवंदनाची जबाबदारी
मुंबई | प्रतिनिधी
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात २६ जानेवारी २०२६ रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ सकाळी ठीक ९.१५ वाजता एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात राजशिष्टाचार विभागाने परिपत्रक जारी करून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय ध्वजवंदन समारंभ आयोजित करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
ज्या कार्यालयांना किंवा संस्थांना स्वतंत्र ध्वजवंदन करायचे असल्यास, त्यांनी सकाळी ८.३० पूर्वी किंवा १० नंतर तो समारंभ घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.
🔹 मुंबईतील मुख्य समारंभ
राज्याचा मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन समारंभ मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथे होणार असून, मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन व समारंभपूर्वक संचलन पार पडणार आहे.
🔹 विभागीय व जिल्हास्तरावरील ध्वजवंदन
राज्यभरातील विभागीय व जिल्हा स्तरावरील मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री, मंत्री अथवा राज्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. त्याची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे 👇
- ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे
- पुणे – उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार
- नागपूर – चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे
- अहिल्यानगर – राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील
- सांगली – चंद्रकांत (दादा) पाटील
- नाशिक – गिरीश दत्तात्रय महाजन
- पालघर – गणेश रामचंद्र नाईक
- जळगाव – गुलाबराव रघुनाथ पाटील
- अमरावती – दादाजी दगडू भुसे
- यवतमाळ – संजय दुलीचंद राठोड
- मुंबई शहर – मंगलप्रभात लोढा
- मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार
- चंद्रपूर – डॉ. अशोक रामाजी वूईके
- नांदेड – अतुल मोरेश्वर सावे
- जालना – पंकजा गोपीनाथ मुंडे
- रत्नागिरी – उदय सामंत
- सातारा – शंभुराज देसाई
- भंडारा – संजय वामन सावकारे
- गडचिरोली – ॲड. आशिष जयस्वाल
- वर्धा – डॉ. पंकज भोयर
- गोंदिया – इंद्रनील नाईक
- बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
- सिंधुदुर्ग – नितेश राणे
- रायगड – भरत गोगावले
- कोल्हापूर – प्रकाश आबिटकर
- लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
- सोलापूर – जयकुमार गोरे
- हिंगोली – नरहरी झिरवाळ
- परभणी – मेघना साकोरे-बोर्डीकर
- अकोला – आकाश फुंडकर
- बीड – बाबासाहेब पाटील
- धुळे – जयकुमार रावल
- धाराशिव – प्रताप सरनाईक
- छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
- नंदुरबार – योगेश कदम
- वाशिम – दत्तात्रय भरणे
राज्यभरात उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांनी दिलेल्या वेळेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
👍




0 टिप्पण्या
Thanks for reading