Advertisement

राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पोंभुर्णा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण यशस्वी

 


राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पोंभुर्णा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण यशस्वी

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्गत कार्यरत राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एएफसी इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


सदर प्रशिक्षणामध्ये सौ. आशाताई झाडे व सौ. शिला झबाडे (रा. जुनगाव, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) यांनी दिनांक 20/02/2026 ते 21/02/2026 या कालावधीत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

या प्रशिक्षणात खालील महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले—


  • घरगुती कचऱ्याचे योग्य विलगीकरण (ओला व सुका कचरा वेगळा करणे)
  • शौचालयाचा नियमित व सुरक्षित वापर
  • सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व
  • स्वच्छता उपांगांची देखभाल व दुरुस्ती
  • नागरिकांच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे

प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल संबंधितांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे प्रमाणपत्र नवी मुंबई येथील अतिरिक्त अभियान संचालक, स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच नवी दिल्ली येथील सहाय्यक महाव्यवस्थापक, एएफसी इंडिया लिमिटेड यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती वाढून गाव पातळीवर स्वच्छ, निरोगी व टिकाऊ पर्यावरण निर्मितीस हातभार लागणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. जुनगाव परिसरात या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या