Chandrapur : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
Bahujan Samaj Party कडून अभिवादन
चंद्रपूर (प्रतिनिधी):
Bahujan Samaj Party, Chandrapur वतीने Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत सन्मानपूर्वक, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. “महापुरुषांच्या सन्मानार्थ” हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे स्वराज्याचे स्वप्न, सामाजिक न्याय, समता व सर्वधर्मसमभावाची शिकवण आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. दादाजी ढाकडे, श्री. किशोर चिकाटे, कोसणकर साहेब, श्री. मारुती गेडाम तसेच युवा कार्यकर्ते विमित कोसे, विवेक दुपारे, रवींद्र गडाम, कार्तिक वानकर, अखिल निमगडे, प्रणित तोडे, रविंदर गडम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला असून उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
— दरारा 24 तास न्यूज नेटवर्क





0 टिप्पण्या
Thanks for reading