Advertisement

माजी सरपंच पतरूजी लाकडे यांचे अपघाती निधन

 


🕯️ माजी सरपंच पतरूजी लाकडे यांचे अपघाती निधन

जून गाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक पथरूजी लाकडे (वय 85 वर्षे) यांचे काल दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास दुर्दैवी अपघातात निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ते वढोली येथे कामानिमित्त गेले असता रस्त्यावर त्यांना एसटी बसची धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

पथरूजी लाकडे यांनी सरपंच म्हणून कार्य करताना गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले होते. त्यांच्या निधनाने जुनगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामस्थ, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आज जुनगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.


🕊️ ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या