Advertisement

बोलता-चालता महिलेचा अचानक मृत्यू; देवाडा बुजमध्ये शोककळा

 


बोलता-चालता महिलेचा अचानक मृत्यू; देवाडा बुजमध्ये शोककळा

दरारा 24 तास | प्रतिनिधी

देवाडा बुज (देवाडा बुद्रुक) येथे एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वनिता विश्वनाथ मेश्राम (वय अंदाजे 60 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेश्राम या सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराजवळील दुकानात जाऊन आल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. त्या बोलता-चालता अवस्थेत असतानाच अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अनपेक्षित घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कुटुंबीयांच्या भेटीस येऊन त्यांना धीर देत आहेत. “मृत्यू कधी, कुठे आणि कसा येईल हे सांगता येत नाही,” अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.


मृत वनिता मेश्राम यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, नातवंडे, जावई असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, त्यांच्यावर उद्या सकाळी ११ वाजता देवाडा बुद्रुक येथील स्मशानभूमीत, वैनगंगा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरारा 24 तास न्यूज नेटवर्कतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या