पोस्ट्स

आणखी एका शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा! राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

इमेज
मूल प्रतिनिधी मूल तालुक्यातील चिचाळा येथील एका शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. मॄत शेतकऱ्याचे नाव भैय्याजी वारलू मोहुर्ले असे आहे. त्याचे वय 55 वर्ष होते. चिचाळा शेतशिवार परिसरात त्याची एक एकर धानाची शेती आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  पोलीसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार सतीश सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची जन्म करीत आहे.

मुख्याध्यापक पदोन्नतीच्या यादीत चक्क सेवानिवृत्त शिक्षकांची नावे!

इमेज
चंद्रपूर (रंजन मिश्रा)    जिल्ह्यातील प्राथमिक मुख्याध्यापकांच्या रिक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पत्र काढले असून यामध्ये 66 रिक्त पदांसाठी 58 शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यांना उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. मात्र या यादीमध्ये चक्क सेवानिवृत्त शिक्षकांची नावे असल्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे अनेक ज्येष्ठांना डावलून कनिष्ठ शिक्षकांची नावे असल्याचा आरोपही केला जात आहे.      चंद्रपूर जिल्ह्यात 66 शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पद रिक्त आहे. या रिक्त पदांवर पदोन्नतीने मुख्याध्यापकांची पदस्थापना करण्यात येणार आहे. यासंदर्भात 28 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता येथील सभागृहामध्ये समुपदेशन ठेवण्यात आलेले आहे. यासाठी पदोन्नती समितीने मान्यता दिलेल्या 58 शिक्षकांचा समावेश आहे. मात्र या शिक्षकांमध्ये काही शिक्षक सेवानिवृत्त झाले असून त्यांची ही नावे पदोन्नती स्थापना करणाऱ्या मुख्याध्यापकांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश...

आज बेंबाळ येथे"कोंबडा आला ग बाई"दंडारीचा प्रयोग

इमेज
मुल: प्रतिनिधी सन्मित्र महिला मंडळ बेंबाळ यांच्या वतीने कोंबडा आला ग बाई या दंडारीच प्रयोग मौजा बेंबाळ येथील "अहिल्याबाई होळकर चौक" येथे होत असून या दंडारीचा प्रयोग बघावा असे आवाहन सन्मित्र महिला मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे.

थ्री स्टार क्रिकेट क्लब नांदगाव च्या वतीने भव्य अंडर आर्म टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन

इमेज
  नांदगाव प्रतिनिधी  मुल तालुक्यातील नांदगाव कला क्रीडा साहित्य संस्कृती जोपासण्याकरिता दुसऱ्यांदा रात्र कालीन भव्य स्टार क्रिकेट क्लब च्या वतीने सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे नांदगाव येथील शितलताई राठोड आदिवासी आश्रम शाळेत दिनांक 27 10 2022 पासून नांदगाव टेनिस प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे सदर क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष भाऊ रावत हे राहणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शिवानी ताई वडेटिवार तसेच ‌ नांदगावच्या सरपंच कुमारी हिमानी ताई वाकुडकर ह्या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सदर क्रिकेट सामन्यांचा दर्शकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अभिजीत दशरथ वाकुडकर यांनी केले आहे.

खुनाचा प्रयत्न करुन आरोपी फरार 👉 पोलीसांत ३०७ दाखल , नियोजित कट असल्याचा दाट संशय

इमेज
👉 पोलीसांकडून श्र्वान पथकांच्या सहाय्याने  तपास  सुरू  मात्र श्रीनगर हादरले ==================== गडचिरोली / प्रतिनिधी   एका अनोळखी आरोपीकडून रात्री साकोली श्रीनगर येथील  क्लिनीकमधे घुसून लॅब चालकावर जीवघेणा चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील प्रभाग ०१ सेंदूरवाफा येथे ( ता. २६ ) च्या रात्री १० सुमारास घडली असून अनोळखी आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांनी श्र्वान पथकाला पाचारण करीत याचा कसून तपास सुरू केला आहे.        २६ ऑक्टोबरला रात्री १० वा. श्रीनगर कॉलनी प्रभाग ०१ मध्ये गोबाडे हॉस्पिटलच्या समोर काव्या क्लिनीकल पॅथॉलाजी लॅबमध्ये एक २५  वर्षीय अनोळखी इसम गेला असता लॅब संचालक कन्हैयालाल निपाने ४२ यांना माझी रक्त तपासणी करून घ्या असे म्हणाला. निपाने यांनी त्याचे नाव विचारताच त्या अनोळखी आरोपीकडून लॅब संचालकावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. यावरच आरोपी थांबला नाही तर मानेला , हातावर व डोक्यावर  चाकूने हल्ला केल्याने निपाने हे रक्ताच्या थारोळ्यात पडले व किंचाळले असता समोरच गोबाडे हॉस्पिटलच्या कम्पाउंडरने धाव घेत रूग्णवाहिकेला पाचारण करीत जखमीला उपजिल्हा...

पोंभूर्णा येथे आशिषभाऊ कावटवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३०ऑक्टोंबर ला भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचा आयोजन*

इमेज
पोंभूर्णा : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामध्ये कोणताही मतभेद नाही.सर्व धर्म जातीसाठी एकच रक्त उपयोग येते आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताची अत्यंत तुटवडा असून त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख तथा विरोधीपक्ष गटनेता नगरपंचयात,पोंभुर्णा आशिषभाऊ कावटवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० ऑक्टोंबर युवासेना तर्फे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व शासकीय ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे महिला आघाडी शिवसेना तर्फे  रुग्णांना फळ वाटप व वृक्षरोपण कार्यक्रम व युवासेना पोंभूर्णा तर्फे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन्सिल वाटप व विविध सामाजिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेले आहे. असे शिवसेना,युवासेना,महिला आघाडीतर्फे सांगण्यात आले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात बोर्डा झुलूरवार येथील एक शेतकरी व एक वन कर्मचारी गंभीर जखमी

इमेज
पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी     पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बोर्डा झुल्लूरवार शेत शिवारातील सर्वे नंबर 178  मध्ये शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने  शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २७ आक्टोंबरला सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वन अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन फटाके फोडून बिबट्याला पडवून लावण्याचा प्रयत्न केला.मात्र चवताळलेल्या बिबट्याने वनकर्मचाऱ्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले असल्याने परिसरात भितिचे वातावरण पसरले आहे.       तालुक्यात वर्षभरापासून अनेक जीव आणि अनेक पशुधन वाघाच्या जबड्यात गेलेले आहेत. मात्र वनविभाग वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना व नागरिकांना संरक्षण देण्यास असमर्थ ठरत आहेत. असेच काहीसे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.        या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव काशिनाथ गावडे वय वर्ष ५४ राहणार बोर्डा झुलूरवार न कर्मचारी मनोज गदेकर, देवाडा खुर्द असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ वन कर्मचारी व अधिकारी घटनास्थळावर दाखल होऊन जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे ...