पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फुटाणा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदावरून वासुदेव पाल यांची उचल बांगडी ‌‌🏹 ‌‌‌ ‌‌ ‌ शेतकऱ्याला पीक कर्ज नाकारल्याने झाली कारवाई. ‌. ‌

इमेज
बडतर्फ अध्यक्ष वासुदेव पाल विजय जाधव: ‌ प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील फुटाणा मोकासा येथे सेवा सहकारी संस्था र.. न. 896 अस्तित्वात असून विविध गावातील या सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केल्या जातात.    परंतु फुटाणा येथील पात्र शेतकरी लाभार्थ्याला सेवा सहकारी संस्थेने पीक कर्ज नाकारल्याने सहायक निबंधक सहकारी संस्था पोंभुर्णा यांनी एका आदेशाद्वारे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव गोपाळापाल यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून पदावरून हटविले असल्याचे आदेश प्राप्त होतात फुटाणा व तालुक्यात खळबळ माजली आहे.  तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ 1 ब तथा महाराष्ट्र शासनाचे व साधारण राजपत्र दिनांक 24 नोव्हेंबर 2021 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार श्री एमडी मेश्राम सहायक निबंधक सहकारी संस्था तालुका पोंभुर्र्णाण जिल्हा चंद्रपूर यांनी श्री वासुदेव पाल यांना सेवा सहकारी संस्था मर्याद ित फुटाणा रजिस्टर नंबर 896 यांना संस्थेच्या संचालक पदावरून काढून टाकल्याची माहिती प्राप्त झाली आहे.       तसेच  कायद्याती...

चंद्रपूर जिल्हा रास्त धान्य दुकानदार सेलच्या अध्यक्षपदी कवडू कुंदावार यांची नियुक्ती -कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये झाली नियुक्ती

इमेज
पोंभूर्णा :-महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार रास्त धान्य दुकानदार सेलचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर अग्रवाल यांनी जिल्हा रास्त दुकानदार सेलच्या अध्यक्षपदी कवडू कुंदावार यांची नियुक्ती करण्यात आली. रास्त धान्य दुकानदार हे वर्षभर धान्य वाटप करीत असतात. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष नसते.रास्त दुकानदारांचे प्रश्न,मागण्या शासनस्तरावर मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने रास्त धान्य दुकानदार सेलची निर्मिती करण्यात आली आहे.पोंभूर्णा तालुक्यातील दिघोरी येथील कवडू कुंदावार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रास्त धान्य दुकानदार सेलच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कुंदावार हे पोंभूर्णा तालुका शासकीय रास्त धान्य दुकानदार असोसिएशनचे २००९ पासून तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या निवडीबद्दल तालूक्यात व जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन अंतर्गत उमरी पोतदार येथे समुदाय व पालक मेळावा संपन्न

इमेज
पोंभुर्णा उमरी पोतदार :- दिनांक 29/01/2023 रोज रविवार ला मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार व ग्राम पंचायत उमरी पोतदार यांच्या समन्वयाने "समुदाय व पालक मेळावा" घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचे सत्र, त्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्यात. तसेच गावातील नागरिक महिला मंडळ , युवक-युवती ह्यांच्या सुद्धा स्पर्धा घेऊन मॅजिक बसच्या संपूर्ण कामकाजाची माहीती देण्यात आली. पोंभूर्णा तालुक्यामध्ये मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे याच्या मार्गदशनाखाली वर्ग 06 ते वर्ग 10 विच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाच्या माध्यमातून जिवन कौशल्य रुजविण्याचे उपक्रम चालू आहे.  तसेच पालकांमध्ये शिक्षणाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याकरीता ह्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. ह्याचाच एक भाग म्हणून उमरी पोतदार येथे पालक व समुदाय मेळाव्याचे आयोजन केलेले होते तर ह्या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून   मा. सौ. ठामेश्वेरी लेनगुरे   सरपंच ग्रा.प. उमरी पोतदार , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री मंगेश उपरे  उपसरपंच ग्रा.प. ...

नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने चौका चौकात नारळाचे वृक्षारोपण

इमेज
मुल तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने गावातील चौका चौकात नारळाचे वृक्ष लावण्यात आले सदर प्रसंगी वृक्षारोपण करताना सरपंच हिमानीताई वाकुडकर यावेळी उपस्थित होत्या.नांदगाव चे माजी उपसरपंच विजय जाधव, तसेच माजी उपसरपंच जोगेश्वर मोरे, सारंग भंडारे, बंडूजी चलाख,किसनजी अलीवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  गावातील चौका चौकात नारळाची झाडे लावण्यात येत असल्याने ग्रामपंचायतच्या अभिनव उपक्रमाबद्दल नागरिकांनी प्रशंशा केलेली आहे.असेच चांगले कार्यक्रम होत राहावे अशी अपेक्षा सुद्धा केलेली आहे.

बल्लारपुरात आज पुरोगामी पत्रकार संघाचे विभागीय संमेलन

इमेज
बल्लारपूर- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघांचे विभागीय पत्रकार स्म्मेलन दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी बल्लाळशाह नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दुपारी १ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात तहसीलदार् डॉ.स्नेहल रहाटे, काँग्रेस चे बल्लारपूर शहर अध्यक्ष करीमभाई,संघाचे राज्य सचिव निलेश ठाकरे,विदर्भ कायदेशीर सल्लागार एड. राजेश सिंग,जिल्हा अध्यक्ष सुजय वाघमारे,जिल्हा कार्याध्यक्ष राकेश सोमाणी यांची उपस्थिती राहील.         दुपारी २:०० वाजता "कराओके गीत गायन स्पर्धा"   शिरसाट यांच्या संयोजना खाली आयोजित केली आहे.दुपारी ३:३० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समरोह तर दुपारी ४:०० वाजता "वर्तमान भारतीय राजकारण आणि पत्रकारिता" या विषयावरील परीसंवादात एड.योगिता रायपुरे हे आपले मत मांडणार आहेत. दुपारी ४:३० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव समारंभ आयोजित केला असून, सायंकाळी ५:०० वाजता आशु वनकर यांच...

शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

इमेज
पोंभूर्णा येथील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क कार्यालयात आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा गटनेता न.पं.पोंभूर्णा, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अतुल वाकडे, युवासेना तालुका प्रमुख, नगरसेवक अभिषेक बद्दलवार, युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगीरीवार, शिवसेना उपतालुका प्रमुख रविंद्र ठेंगणे,विजय वासेकर,आशिष कावडे, ग्राम पंचायत सदस्य पवन गेडाम,संदिप सुमटकर, साहील नैताम,निकेश कपाट, व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरपंचयातमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

इमेज
पोंभूर्णा : हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सुलभा पिपरे,उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार,विरोधी पक्षनेता आशिष कावटवार,मुख्याधिकारी आशिष घोडे,पाणी पुरवठा सभापती नंदा कोटरंगे,नगरसेवक अभिषेक बद्दलवार,संजय कोडापे,महेश रणदिवे,नगरसेविका रिना उराडे, श्वेता वनकर,शारदा गुरुनुले,विभाग प्रमुख सुशांत आमटे,लिपिक रोशन येमुलवार,वंदना गागंरेड्डीवार,वाघाडे,शशिकांत पिल्लीवार,राकेश बावने,महेश्वरी पिंपळशेंडे,अजित जूवारे व आदी उपस्थित होते.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, पार्थिव शरीर मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय

इमेज

बोगस डॉक्टर च्या उपचारांमुळे महिलेचा गर्भपात- अर्भक दिले कुत्र्याला खायला, महिलेचाही मृत्यू

इमेज
हाजीपूर: बिहार मधील हाजीपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.एका बोगस डॉक्टर दाम्पत्याकडे उपचारासाठी गेलेल्या महिलेचा गर्भपात झाला.या दरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिचाही मृत्यू झाला.     या बोगस डॉक्टर पुरावे नष्ट करण्यासाठी भ्रुण कुत्र्यांना खायला घातला.कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता ही खळबळजनक बाब उघडकीस आली.पोलीस तपासात सदर नर्सिंग होम देखील बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे.तसेच या डॉक्टर दाम्पत्याकडे एमबीबीएस ची डिग्री नसल्याचेही उघड झाले आहे. घटनेनंतर डॉ. दाम्पत्य फरार झाले आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने इको गाडीला उडवले! नऊ जण ठार एक बालक जखमी

इमेज
मुंबई: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 19 जानेवारीच्या पहाटे पाच वाजता सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात लहान मुल बचावला आहे. या मुलावर माणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून उपचार सुरू करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे.      प्राप्त माहितीनुसार ट्रक आणि इको कारमध्ये हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की नऊ जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात चार वर्षाचा लहान मूल बचावला आहे.      पाहाटे पाच वाजताच्या सुमारास ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या इको कारला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरील रहदारी विस्कळीत झाली आहे. ग्रस्त कार बाजूला करण्यात आले असून रहदारी हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

शेतकरी उत्पादक नाही तर उघोजकाच्या भुमिकेत असावा: वक्त्यांचा सूर

इमेज
 (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ) आज दिनांक 19/01/2023 गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वरोरा येथे MCX कॉटन किंवा कापूस फायदे बाजार शेतकऱ्यांसाठी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वरोरा यांच्या तर्फे संयुक्तरीत्या आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने प्रशांत चासकर, कुशाग्र मुंगी तसेच रवींद्र मनोहरे कृषी उपसंचालक आत्मा चंद्रपूर, तालुका कृषी अधिकारी . एस भोयर, दीपक बेदरकर MCDC, प्रशांत नवले MSWC, .यशवंत सायरे, संजय नारळे, हिरालाल बघेले आबिद अली बंडू डाखरे बळीरामजी डोंगरकर गणेश वाभिटकर व बालाजी धोबे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष . दीक्षा जानी व्यवस्थापक MCX यांनी शेतकऱ्यांसाठी कापूस वायदे बाजार चे महत्व थोडक्यात समजून सांगितले. प्रशांत नवले यांनी वखार महामंडळाची शेतकऱ्यांसाठी असणारी भाड्यातील सूट मालाची सुरक्षा व उपलब्ध असलेले तारण कर्ज इत्यादींची माहिती दिली. रवींद्र मनोरे शेतकऱ्यांना कापूस निघल्याबरोबर त्य...

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड: राजकीय पुढार्‍यांची आरोपींना सोडून देण्याची केविलवाणी धडपड: मात्र पुढार्‍यांना मान देऊनच आरोपींवर कारवाई करण्याची ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांची भूमिका ! ठाणेदाराच्या कार्यवाहीचे तालुक्यात होत आहे स्वागत

इमेज
जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड: राजकीय पुढार्‍यांची आरोपींना सोडून देण्याची केविलवाणी धडपड: मात्र पुढार्‍यांना मान देऊनच आरोपींवर कारवाई करण्याची ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांची भूमिका !  ठाणेदाराच्या कार्यवाहीचे तालुक्यात होत आहे स्वागत तालुका प्रतिनिधी शहरात काही ठिकाणी चिल्लर आणि ठोक जुगार खेळल्या जातो. या जुगारात अर्थात व्यवसायात! अनेक गोरगरीब तरुणांचे संसार उध्वस्त होतात. जुगारात बसलेला व्यक्ती आपल्या घरचे भांडीकुंडी सुद्धा जुगारात हारतो. अशी परिस्थिती नुसती चित्रपटातच पाहायला मिळत नसून प्रत्यक्षात असे प्रकार पाहायला मिळतात. असे असतानाही नामवंत आणि श्रीमंत या खेळाशिवाय रहात नाही. असा प्रत्येक आज येथे आला.     शहरात काही नामवंत आणि छोटे-मोठे असे पोलिसांच्या धाडीत जुगार खेळताना हस्तगत झाले. मात्र खेळताना आनंद वाटला, पोलीस येताच त्यांची दमछाक नव्हे घाबरगुंडी उडाली.      पोलिसांनी आपली रीतसर कारवाई करून सर्व जुगार यांना ठाण्यात जमा केले. ही वार्ता शहरात पसरतात काही राजकीय पुढारी या जुगारांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या येरझारा मारू लागले. मात्र ठाणेदार धर्मेंद्र जोशी हे आपल्या कर्तव्यात...

पोंभुर्णा तालुका पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी

इमेज
मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून पत्रकार भावनांच्या कार्यालयात आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोज शुक्रवारला पत्रकार भावनात साजरी करण्यात आली. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक महासागर चे तालुका प्रतिनिधी तथा माजी सरपंच बबन भाऊ गोरंतवार हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरपंचायत विरोधी गटनेता आशिष भाऊ कावटवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी नीलकंठ भाऊ ठाकरे, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी सुरज गोरंतवार, दैनिक नागपूर पोस्ट, तथा दैनिक सुपर भारत, आणि चंद्रपूर समाचार चे तालुका प्रतिनिधी जीवनदास गेडाम, दैनिक भास्कर चे तालुका प्रतिनिधी पंकज वडेट्टीवार, पत्रकार अविनाश वाळके, दैनिक लोकमतचे सुरेश कोमावार, दैनिक सकाळचे विजय वासेकर, दैनिक पुण्यनगरी चे दुर्वास घोंगडे, दैनिक लोकमतचे विकास शेडमाके, प्रदीप झाडे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर एका गंभीर विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली. ...

आयकर विभागाने दिला अंतिम इशारा, 👉 लवकर करा ‘हे’ काम अन्यथा होईल PAN card निष्क्रिय

इमेज
नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 6/1/2023:-  सध्याच्या काळात पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे बनले आहेत. अनेक महत्वाच्या कामांमध्ये याचा वापर अनिवार्य झाला आहे. याबरोबरच अनेक सरकारी योजनांचा लाभ देखिल याशिवाय घेता येणार नाही. मात्र आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केलेल्यांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे. एका ताज्या एडवायझरीनुसार, जर आपले पॅन कार्ड 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होईल. कारण या तारखेनंतर अशा लोकांना आपले पॅन कार्ड वापरता येणार नाही. आयटी अॅक्टनुसार 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही तर ते निष्क्रिय होईल. ज्यामुळे 1 एप्रिल 2023 पासून याचा वापर कोणत्याही कामासाठी करता येणार नाही. आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालयातील जनतेला यातून सूट देण्यात आली आहे, याशिवाय 80 वर्षांवरील लोकांनाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅनला आधारशी जोडण्याची मुदत ३१ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत दिली आहे. आपले पॅन- आधार लिंक आहे की नाही ते तपासावे . सर्वात आधी आयकर विभागाच्या ई-फ...

बेंबाळ येथे अग्नी तांडव, घर जळून लाखोचे नुकसान

इमेज
विजय जाधव:मूल प्रतिनिधी मूल तालुक्यातील बेंबाळ येथील अमोल मुरलीधर पगडपल्लिवार यांचे शॉर्टसर्किट मुळे घर जळाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत पगडपल्लिवार यांचे घरी असलेले टीव्ही, कुलर, बेड, कपाट, पैसे, कपडे, सोना संपूर्ण संपूर्ण घरगुती साहित्य जळून खाक झाले. घर मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अंदाजे चार लाखापर्यंतचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घराशेजारी आणि गावातील नागरीकानी गर्दी केली आणि आग विझविण्यात यश आले. माञ तोपर्यंत अमोल मुरलीधर पगडपल्लिवार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पगडपल्लिवार यांनी गटातून काही पैसे घेतले होते, ते ही या आगीत जळून खाक झाल्याची माहिती आहे.

पोंभुर्णा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज साजरा होणार पत्रकार दिन

इमेज
प्रतिनिधी: मराठी पत्रकार सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरी केली जाते. राज्य सरकारच्या वतीने ही शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्याचे आयोजिले आहे. पत्रकार संघाच्या भावनात हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जुनगाव च्या अध्यक्षपदी बंडुजी येलमुले यांची अध्यक्षपदी निवड

इमेज
पोंभुर्णा: परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना ही गावागावात व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवत आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुण व्यसनमुक्त होत आहेत ही आनंदाची बाब आहे.       तालुक्यातील जुनगाव येथे सुद्धा ही संघटना कार्यरत असून या संघटनेच्या शाखा अध्यक्षपदी बंडुजी पाटील येलमुले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी चे त्यांच्या चाहत्यांकडून स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

बिरसा क्रांती दलाचे जिल्हास्तरीय अधिवेशन चंद्रपूरात संपन्न

इमेज
संतोष कुळमेथे राजुरा तालुका प्रतिनिधी राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले जयंती व संविधान सभेतील आदीमांचा आग्रही आवाज मारांग गोमके जयपालसिह मुंडा जयंती यांच्या संयुक्तविद्यमाने चंद्रपूर येथे बिरसा क्रांती दलाचे जिल्हास्तरीय अधिवेशन श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृह चंद्रपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ जी मडावी. उद्घाटक पदी चंद्रपूर चे आमदार किशोर भाऊ जोर्गेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून रंगराव काळे राज्य अध्यक्ष, डी. बी. अंबुरे राज्य उपाध्यक्ष,प्रभाकर गेडाम विदर्भ संघटक,किसनराव कोटणाके मोकाशी उपस्थित होते. जयपालसिंह मुंडा हे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान संविधान सभेतील आदिवाशी समाजाचे अभ्यासू सदस्य . आपली ठाम भूमिका मांडून अनेक कायदे आदिवासीसाठी करण्यात आग्रही भूमिका. नौकरी सोडून आदिवासीं चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्याचे आदर्श घेहुन मुलांनी आपल्या अंगी स्वाभिमान बाळगावा .असे मत बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी ह्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.  राष्ट्रमाता सावित्रीमाई ह्यांनी महिलांना शिक्षणाचा अध...

सावित्रीबाई जन्मली नसती तर महिला प्रधानमंत्री झाली नसती-उपसरपंच राहुल भाऊ पाल यांचे प्रतिपादन

इमेज
सावित्रीबाई जन्मली नसती तर महिला प्रधानमंत्री झाली नसतीउज्वल ग्राम संघ जुनगाव यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी तालुका प्रतिनिधी ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिला आपापल्या पद्धतीने सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतात. तालुक्यातील जुनगाव येथील "उज्वल ग्राम संघ" आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच तथा पत्रकार जीवनदास गेडाम हे लाभले होते, तर उद्घाटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत जुनगाव चे सरपंच श्री राहुल भाऊ पाल हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य विश्वेश्वर भाकरे, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ संगीता ताई झबाळे, सौ चुधरी ताई, आशाताई झाडे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची पूजा अर्चा करून करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले....

नागभीड येथे बँड पथकाच्या साह्याने पोलीस वर्धापन दिवस साजरा

इमेज
अरुण रामुजी भोले नागभीड तालुका प्रतिनिधी नागभीड ---- महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिना निमीॅत्य पोलीस स्टेशन नागभीड यांच्याा विद्यमाने  वाहतुक,रस्ता सुरक्षा रॅलीचे विशाल आयोजन करून जनजागरण करण्यात आले.पोलीस निरिक्षक राजुभाऊ मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितित कर्मविर विद्यालय येथील शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी विराट रॅलीत सहभाग घेवून नागभीड शहरातील मुख्य मार्गावर सुरक्षा वाहतुकीचे नियम,गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा,अशा प्रकारचे नारे देत विद्याथ्यानी सुरक्षा सप्ताहाची रॅली काढली,यावेळी पोलीस निरिक्षक राजु मेंढे, वैभव कोरवते, उप,निरिक्षक साखरे , बारसागडे,सुधाकर माकोडे कर्मवीर विद्यालय चे प्राचार्य देविदास चिलबुले, सर्वश्री प्रा, देवानंद प्रधान, विलास गजभे, संजय दुपारे ,शिरीष कामडी , लोमेश दुधे,सचिन मलवे ,रवी बोरकर,कु,सोनू रेवतकर,कु, सोनाली घोल्लर,रॅलीत जवळपास 300 विद्यार्थीच्या सहभागातुन , बॅड पथकाच्या साह्याने वाजत गाजत नागभीड शहरातील मुख्यमार्गाहून परत पोलीस स्टेशन येथे आली. शालेय विद्यार्थीना नात्या, मिठाई देवून मुलांचे कौतुक करण्यात येवून रॅलीची सांगता झाली.