Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भाच्या भूमीत सापडला मोठा खजिना! आता उलगडणार 20 कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास,



विदर्भाच्या भूमीत सापडला मोठा खजिना! आता उलगडणार 20 कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास,


चंद्रपूर:भद्रावती ते चंदनखेडा मार्गावर शेती आणि जंगलात काही ठिकाणी ही अतिप्राचीन पुरावे सापडली आहेत. पर्यावरण आणि जीवाश्म संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी हा ठेवा शोधून काढलाय. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील भूगर्भात दडलेली डायनोसॉर,हत्ती,स्ट्रोमॅटोलाईट,शंख शिंपले , तसंच झाडांची आणि पानांची जिवाश्म शोधून काढली आहेत. आता तब्बल 20 कोटी वर्षांहून जुन्या जुरासिक काळातील जिवाश्म आढळल्यानं त्या काळातील इतिहासाची माहिती आपल्याला मिळणार आहे.

'चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या परिसरात असंख्य खनिजसाठा आहे. चंद्रपूरच्या परिसरात जिवाष्मे असल्याची भूशास्त्र विभागाची नोंद होती परंतू चांगली जीवाश्म मिळाली नव्हती. गेल्या काही वर्षापासून या परिसरात माझं संशोधन सुरू होतं. भद्रावती-चंदनखेडा या मार्गावरील शेती आणि जंगलात काही ठिकाणी हे पुरावे सापडले आहेत,' अशी माहिती प्रा. चोपणे यांनी दिली.

'चंद्रपूर जिल्हा हा भूशास्त्रीय दृष्ट्या एक संग्रहालय असून येथे 300 ते 6 कोटी वर्षे जुने बहुतेक प्रकारची खडक आढळतात. तर 25 कोटी ते 25 हजार वर्षे प्राचीन जीवाश्मे आढळतात. 20 कोटी वर्षांपूर्वी ही झाडं जिवंत होती. त्यावेळी पृथ्वीवर डायनासॉरचं अस्तित्व होतं.

पृथ्वीवर तेव्हा पांजिया हा एकच खंड होता. भारताचा भूप्रदेश आजच्या ऑस्ट्रेलियाला लागून होता. प्राचीन भारताच्या आणि चीनच्यामध्ये टेथीस हा समुद्र होता. त्यानंतर कोट्यवधी वर्षांनी भारतीय भूखंड उत्तरेला सरकला. त्याची चीनच्या भूखंडला टक्कर दिली. त्यामधून हिमालय पर्वताची निर्मिती झाली. अजूनही भूकवचाची गती उत्तरेकडं सरकत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील भूगर्भात अजून असे अनेक रहस्य दडलेली असून भूशास्त्र विभागाने आणि संशोधकानी सविस्तर संशोधन केल्यास भविष्यात त्याचे गुपीत उलगडेल, असा विश्वास प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला.

साभार

Post a Comment

0 Comments