Ticker

6/recent/ticker-posts

*▪️१३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात अटक* *▪️लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही*

*▪️१३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात अटक*


*▪️लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही*

*पोंभूर्णा/०६ ऑक्टोबर.*


ग्रामपचायत उमरी पोतदार येथे १५ व्या वित्त आयोगामधुन सन २०२१-२०२२ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपुर अंतर्गत योगा शेडचे बांधकाम मंजूर झाले होते. बांधकाम अंदाजे किंमत ३,४९,३२१ /- रू. चे काम पूर्ण केलेले होते. सदर योगा शेड  बांधकामाकरिता लागलेल्या मटेरिअल व साहित्याचे पुरवठाचे    ग्रामसेवक यांनी २,४४.५२५/- रू चे बिल ग्रामसेवक देवानंद गेडाम यांनी काढून दिल्यानंतर तक्रारदार उर्वरित मजुराची रक्कम काढून देण्याकरिता ग्रामसेवक देवानंद गेडाम यांना भेटले. त्यांनी योगा शेड कामावर अंदाजे किंमत ३,४९,३२१/- रू. या कामावर पाच टक्के प्रमाणे १७,५००/- रू.ची  लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी ग्रामसेवक देवानंद मुर्लीधर  गेडाम, उमरी पोतदार यांना लाच  देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्याचेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी  ग्रामसेवक देवानंद मुर्लिधर गेडाम, उमरी पोतदार यांनी झालेल्या कामाचे पाच टक्के प्रमाण १७,५०० /- रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती १३,०००/- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून ग्रामपंचायत कार्यालय उमरी पोतदार येथे पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी ग्रामसेवक देवानंद मुर्लिधर  गेडाम उमरी पोतदार यांना १३,०००/-रु. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही नागपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त, पोलिस अधीक्षक  राहुल माकणीकर,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर चे अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, तसेच  चंद्रपुर लाप्रवि पोलीस उपअधिक्षक  मंजुषा भोसले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, 
तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोअ  संदेश वाघमारे, पोअं राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.🔅
================================

Post a Comment

0 Comments