Ticker

6/recent/ticker-posts

जुनगाव येथे "महिलांच्या दंडार" कार्यक्रमाचे आयोजन-दिग्गजांची उपस्थिती


जुनगाव येथे "महिलांच्या दंडार" कार्यक्रमाचे आयोजन-दिग्गजांची उपस्थिती


द्वारा: अजित गेडाम,
पोंभुर्णा: दंडार लोककला महाराष्ट्राची पारंपारिक लोककला आहे. यातून महाराष्ट्राच्या परंपराचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते. दंडार एक लोककला आजच्या घडीला लोप पाबत चालली असली तरी ग्रामीण भागात आजही दंडार या कार्यक्रमाला महत्वव आहे. या लोककलेची आवड असणाऱ्या पुरुष मंडळींनी यातच प्राविण्य मिळवले आहे. पुरुष तर दमदार करून आपली लोककला दाखवून लोकांचा मनोरंजन सर करतातच त्यातील प्रबोधन सुद्धा करतात. मात्र महिला या लोकसभेत विशेष सहभाग होऊन कला दाखवण्याचे धाडस दाखवत नाही. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली चेक मलेझरी येथील महिलांनी ही कला मात्र टिकवून ठेवली आहे. दंडारीमध्ये संपूर्ण महिला कलाकारांची टीम कार्यरत आहे.
या महिलांच्या दंडार कार्यक्रमाचे आयोजन गुणगाव येथे दिनांक 27 12 2022 रोजी रात्री दहा वाजता करण्यात आले आहे. विशेषण म्हणजे या दंडारीच्या कार्यक्रमाला दिग्गज उपस्थित दर्शवणारत आहेत. त्यामुळे या दंडारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातल्या त्यात महिलांची दंडार बघण्यासाठी लोकांची सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंचकला दंडार मंडळ अडपल्ली संगीत " *बहीण लाडाची, वहिनी काळाची! अर्थात भाषाचा खून"* या दंडारीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटक म्हणून मुल येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि  कॉन्ट्रॅक्टर कथा बिल्डिंग मटेरियल सप्लायर ते राहणार आहेत. सह उद्घाटक म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा चे तालुका उपाध्यक्ष आणि जुनगाव चे उपसरपंच श्री राहुल भाऊ पाल, फुटाणा ग्रामपंचायतचे उपसरपंच व भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष नैलेश भाऊ चिंचोलकर हे राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी मूलपंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पाटील चुदरी, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अजय भाऊ मस्के, दीप प्रज्वलन ज्योती भाऊ चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत घोसरी, जगदीश भाऊ बांगरे उपसरपंच बोंडाळा बुद्रुक, माजी सरपंच जालिंदर भाऊ बांगरे बोंडाळा बुद्रुक, निलेश भाऊ मगनुरवार, हे करणार आहेत.


पुनम ताई चूधरी सरपंच जुनगाव, कान्हुजी पाटील भाकरे पोलीस पाटील, प्रफुलचंद्र चुधरी तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार व माजी सरपंच जीवनदास गेडाम, विश्वेश्वरराव भाकरे ग्रामपंचायत सदस्य, तेजपालजी रंगारी ग्रामपंचायत सदस्य, पल्लवी देशमुख ग्रामपंचायत सदस्य, सोनी ताई चंद्रकांत चुधरी ग्रामपंचायत सदस्य, माधुरी प्रकाश झबाडे ग्रामपंचायत सदस्य, श्री पांडुरंग पाटील पाल, उपाध्यक्ष सेवा सहकारी संस्था देवळा बुद्रुक, मुरलीधर पाटील चुदरी सरपंच बोंडाळा, भोजराज पाटील चुधरी घोसरी, अतुल भाऊ चौधरी तंटामुक्ती अध्यक्ष देवाडा बुद्रुक, अशोक जी मंडवगडे ग्रामपंचायत सदस्य देवाडा बुद्रुक, प्रकाश भाऊ भाकरे सामाजिक कार्यकर्ता जुनगाव इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले आहेत.


या दंडारीचा लाभ घ्यावा असे आवाहन नवचैतन्य दंडार मंडळ जुनगाव यांच्यावतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments