Advertisement

बोंडेळा बुज. येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या .. .आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात कुटुंबावर आघात ...

बोंडेळा बुद्रुक येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ..


.आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात कुटुंबावर आघात ...

मुल प्रतिनिधी...

मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबाळ पोलीस दुरक्षेत्राच्या अंतर्गत येत असलेल्या बोंडा बुद्रुक येथील बावीस वर्षीय तरुणाने घरच्या अंगणातील असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना आज सकाळी उघडकीस आली. दिलखुश सोमाजी नागापुरे वय अंदाजे 22 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.


दिलखुश नागापुरे हा सर्वांशी मनमिळावू पणाने वागत होता शांत आणि संयमी वृत्तीचा हा तरुण अचानक अशा पद्धतीचे टोकाचे पाऊल का उचलले हे गावातील लोकांना कोडेच आहे. घटनेची माहिती बेंबाळ पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मोका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल येथे पाठवण्यात आला.
https://youtu.be/l5zzDGLcSoo

*Suicide । बोंडेडा बुजरूक येथील 22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या*

https://youtu.be/l5zzDGLcSoo

मृतकाच्या मागे वडील, भाऊ आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. पुढील तपास मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुमित प्रत्येकी यांच्या मार्गदर्शनात बेंबाळ पोलीस करीत आहेत. मात्र दिलखुश च्या आत्म्याहतेने संपूर्ण गावावर शोक कळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या