दरारा 24 तास
हरियाणा विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केली आहे. आता यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राम बिलास शर्मा यांच्या नावाचाही समावेश झाला आहे, ज्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून महेंद्रगडमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या जागेवरून भाजपने अद्याप उमेदवार दिलेला नाही. शर्मा यांना तिकीट मिळणार नाही, असे मानले जात होते, त्यामुळे त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता.
0 टिप्पण्या
Thanks for reading