*साला मी अडाणी होतो*
*तेच बर होत...* ☺️
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं ...
साधा सर्दी खोकला झाला,
की आलं, तुळशीचा काढा घ्यायचो,
पोट दुखलं की ओवा चावत जायचो,
ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो,
ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट,
ना हॉस्पिटलच्या एडमिशन मध्ये अडकत होतो...
निरोगी आयुष्य जगत होतो..
*साला मी अडाणी होतो*
*तेच बर होत...* ☺️
राम राम ला राम राम,
सलाम वालेकुम ला, वालेकुम अस्सलाम,
आणि जय भीम ला जय भीमनेच प्रेमाने उत्तर देत होतो,
ना धर्म कळत होता
ना जात कळत होती
माणूस म्हणून जगत होतो...
*साला मी अडाणी होतो*
*तेच बर होत...* ☺️
सकाळी न्याहारीला दूध भाकरी, दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,
हेल्दी ब्रेकफास्टचा मेनू
लंचचा चोचलेपणा आणि
डिनरच्या सोफेस्टिकेटेड उपासमारी पेक्षा दिवस भर भरपेट चरत होतो...
*साला मी अडाणी होतो*
*तेच बर होत...* ☺️
शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो
रामायणात रंगून जात होतो, चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो,
ना वेबसिरीजची आतुरता,
ना सासबहुचा लफडा ,
ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो...
खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो...
*साला मी अडाणी होतो*
*तेच बर होत...* ☺️
सण असो की जत्रा,
सुट्टी मिळाली की कुटुंबासोबत मस्त वेळ घालवत होतो,
चार मित्रांमध्ये मिसळत होतो, लोकांमध्ये उठत बसत होतो...
ना टार्गेटची चिंता होती,
ना प्रमोशमनचं टेन्शन हो़तं,
ना पगार वाढीची हाव होती,
तणावमुक्त जीवन जगत होतो...
*साला मी अडाणी होतो*
*तेच बर होत...* ☺️
गावांतले वाद गावांतच मिटत होते,
झाली भांडणं, तरी रात्री मंदिरात एकत्र येत होतो,
सकाळी पुन्हा एकत्र फिरत कामाला लागत होतो..
ना पोलीस केस ची भीती,
ना मानहानी चा दावा,
ना कोर्टाच्या चकरा मारत होतो.
खरोखर सलोखा जपत होतो.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बर होत...* ☺️
कुटुंबाला प्रेमाने पत्र लिहीत होतो, त्यांच्या पत्राची वाट बघत होतो,
पत्राच्या प्रत्येक ओळीत प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो...
ना मोबाईलवरची कोरडी बोलणी,
ना फॉरवर्ड मेसेज,
ना ऑनलाइनची निरर्थक चॅटिंग उगाचचा फक्त दिखावा करत नव्हतो
*साला मी अडाणी होतो*
*तेच बर होत...* ☺️
मातीच्या घरात रहात होतो, सारवलेल्या अंगणात बागडत होतो,
ऐसपैस अर्धा एकरभर जागेत सुखात सगळे नांदत होतो...
ना वन् बिएचके मध्ये कोंबलो होतो,
0 Comments