Advertisement

अहेरी पोलिसांना लागला दारू तस्करातील मोठा मासा गळाला

मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी

अहेरी: गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी चोरीछुपया मार्गाने मोठ्या प्रमाणात पोलिसांना चकमा देत मोठे तस्कर देशी विदेशी दारूचा धंदा करत आहेत. जिल्ह्याला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात दारूच्या पुरवठा होतो. अशाच एका मोठ्या माशाला अहेरी गडाला अडकवले आहे. तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असतात. अहेरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर दि. 27/04/2025 चे 01/30 वा. ते 02/30 वा दरम्यान रात्रीच्या सुमारास भुजंगरावपेठा गावाजवळ पोलिसांनी सापळा रचून अवैद्य दारूसह 5,98,400/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनवर खान अबुलहसन खान वय 40 वर्षे धंदा चालक रा. मौलाना आझाद वार्ड, बल्लारपुर, ता.बल्लारपुर जि. चंद्रपुर असे आरोपीचे नाव आहे.तर सिध्दार्थ भास्कर रंगारी वय 35 वर्षे धंदा चालक रा. रविंद्र नगर बल्लारपुर, ता. बल्लारपुर जि. चंद्रपुर असे वाहन चालकाचे नाव आहे. मुखबीरच्या खात्रीशीर खबरेवरुन दोन पंचा समक्ष नमुद आरोपीतांच्या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनाच्या floor panel च्या खाली, कोणालाही लक्षात न येण्या खाली येण्या सारखे कप्पे बनवून त्यात वर नमुद वर्णनाचा दारुचा मुद्देमाल भरून अवैधरित्या विना परवाना वाहतुक करताना मिळुन आल्याने सदर आरोपीतां विरुद्ध कमल 65 (अ), 83 महादाका प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

मिळालेला माल-किंमत, जप्त मालाचे वर्णन-

1) 1,44,000/-रू किंमत 3000/-रु. प्रमाणे ROYAL STAG असे लिहिलेले 2000 एम. एल. मापाचे 48 नग सिलबंद नग प्रती नग किं.

2) 86,400/-रु - HAYWARDS 5000 PREMIUM STRONG BEER असे लिहिलेले 500 एम. एल. मापाचे 2 सिलबंद नग प्रती नग विक्रि किंमत 300/-रु. प्रमाणे

3) 48.000/-रु रॉकेट देशी दारु संत्रा असे लिहिलेले 90 एम. एल. मापाचे 600 नग सिलबंद निपा प्रती नग विक्रि किंमत 80/- रु. प्रमाणे

4) 3,00,000/-रु एका निळ्या रंगाची अशोक लेलँड कंपनीची मालवाहतुक चारचाकी वाहन क्र. MH34AB6070 असलेली जुनी वापरती गाडी किंमत अंदाजे 3,00,000/- रुपये

5) 10,000/-रु एक विवो कंपनीचा जुना वापरता मोबाईल किंमत अंदाजे 10,000/-रुपये। MEI नंबर 869296061178996

6) 10,000/-रु - एक वियो कपनीचा जुना वापरता मोबाईल किंमत अंदाजे 10,000/-रुपये IMEI नंबर 861556040598871असा एकूण 598,400/-रु किंमतीचा प्रोव्हीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर ची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार, स.पो.नी. देवेंद्र पटले PSI तराडे, यांचासह नापोशि. हेमराज गरीबजी वाघाडे, पो. शि. वाकडे,, मपोहवा शिवम्मा नैताम पोस्टे अहेरी व इतर सहकारी यांनी केली. या कारवाईने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या