राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांच्याविरुद्ध अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल
मूल (प्रतिनिधी) :
मूल येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांच्याविरोधात अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजीत गुलचंद खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी दिनांक ८ मे रोजी हा गुन्हा नोंदवला.
खोब्रागडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगेश पोटवार हे पत्रकार म्हणून वारंवार जाहिरातीसाठी दबाव आणत होते. तसेच, टेकाडी येथे बोअरवेलच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपण माहितीच्या अधिकाराखाली (RTI) अर्ज केला होता. त्यामुळे पोटवार यांनी चिडून दिनांक ८ मे रोजी नागपूर रोडवरील एका गॅरेजमध्ये माझ्यावर जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मंगेश पोटवार यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर "माजी नगरसेवक व पाच-सहा लोक मिळून माझ्याविरोधात खोटे प्रकरण उभे करत आहेत" अशी पोस्ट केल्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading