Advertisement

जूनगाव येथील मारोती आभारे यांचे दुःखद निधन..

जूनगाव येथील मारोती आभारे यांचे दुःखद निधन..


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क..
जूनगाव (ता. पोंभुर्णा) – येथील रहिवासी मारोती नथ्थूजी आभारे (वय ६२ वर्षे) यांचे आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते काही दिवसांपासून एका जटिल आजाराशी झुंज देत होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मारोती आभारे हे गावात एक मनमिळावू आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांबरोबरच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा देवराव, सून, नातवंडे व इतर आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वैनगंगा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आभारे कुटुंबियांच्या या दुःखद प्रसंगी सर्व गावकरी व नातेवाईकांनी शोक व्यक्त केला असून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या