हवेली गार्डन परिसरात बुद्ध जयंती उत्साहात साजरी..
धर्मपाल कांबळे, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर..
चंद्रपूर (दि. 12 मे 2025) — त्रिरत्न सम्यक संबोधी बहुउद्देशीय महिला मंडळ, हवेली गार्डन च्या वतीने बुद्ध जयंतीचा भव्य कार्यक्रम मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सकाळपासूनच बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता रात्रीच्या भव्य संगीत संध्याकाळी झाली.
सकाळचा सत्र (प्रथम सत्र):
सकाळी 9 वाजता कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दीपप्रज्वलन मान. सुरेखा पथाडे मॅडम आणि मान. बिना मुंजनकर मॅडम यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना पार पडली.
या वेळी माननीय मनोहर साखरे साहेब आणि माननीय उमरे साहेब यांनी उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात बौद्ध धम्माचे महत्त्व, तथागत बुद्धांचे विचार आणि बाबासाहेबांच्या धम्मकार्यातील योगदान यावर मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी नाश्ता आणि खीर यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन राजानंद दुधे सर यांनी अतिशय नेटकेपणाने पार पाडले.
सायंकाळचा सत्र (द्वितीय सत्र):
सायंकाळी 6.00 वाजता पुन्हा प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन मान. कल्पना बुरचुंडे मॅडम, मान. सपना कांबळे मॅडम आणि मान. दिशमा रामटेके मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण घेतले गेले.
यानंतर माननीय कवरासे सर आणि त्यांच्या टीमतर्फे "बुद्ध व भीम गीते" या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात झाली. रात्री 7.00 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम तीन तास रंगला. संगीतमय सादरीकरणात ऑक्टोपॅडवर मान. संदीप मंडल, कीबोर्डवर मान. मुकेश कुमार, तबल्यावर मान. सतीश कवरासे सर यांनी साथ दिली. गायक म्हणून मान. संजय माशीरकर सर, मान. अमर घिराले सर, मान. प्रिया मंडल मॅडम, कुमार अथर्व कवरासे आणि मान. अविनाश जुमडे सर यांनी आपल्या आवाजाने वातावरणु मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित भाविकांनी संगीतातून बौद्ध विचारांचे गोडवे ऐकले व त्यातून प्रेरणा घेतली. रात्री 9.30 वाजता सर्वांसाठी मसाला भात व कळी यांचा अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा मान. दुधे सर यांनी केले तर पाहुण्यांचे आभार प्रा. मुंजनकर सर यांनी मानले.
या कार्यक्रमात त्रिरत्न सम्यक संबोधी बहुउद्देशीय महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि हवेली गार्डन परिसरातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांचे मोठे सहकार्य लाभले.
धन्यवाद!
— त्रिरत्न सम्यक संबोधी महिला मंडळ, हवेली गार्डन, चंद्रपूर
0 टिप्पण्या
Thanks for reading