‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यगाथेचे स्मरण; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित
जुनगाव (प्रतिनिधी) | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दाखवलेल्या शौर्याचा गौरव करत तसेच अतिरेकी हल्ल्यांत शहीद झालेल्या वीर जवान व नागरिकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी, जुनगाव येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली महिला बचत गटाच्या प्रवर्तिका सौ. आशाताई झाडे यांच्या पुढाकाराने उद्या, बुधवार दिनांक २१ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरमधील लष्कराच्या धाडसपूर्ण कारवाया, तसेच त्यामध्ये सहभागी असलेल्या जवानांचे शौर्य, जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आणि त्यांच्याबद्दल अभिमान निर्माण करण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.
या रॅलीमध्ये गावचे सरपंच राहुल भाऊ पाल, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रफुलचंद चौधरी, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विश्वेश्वर भाकरे, रेफरचंद आभारे, माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, तसेच महिला बचत गटातील सर्व सदस्य—महिला व पुरुष—उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजिका आशाताई झाडे यांनी दिली.
सदर तिरंगा रॅलीत गावातील सर्व नागरिक, विविध संस्था, बचत गट, युवक मंडळे तसेच काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या माध्यमातून एकात्मतेचा, देशभक्तीचा आणि शौर्याचा संदेश दिला जाणार आहे. नागरिकांनी या देशभक्तिपूर्ण उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
0 टिप्पण्या
Thanks for reading