Advertisement

ट्रकच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू; कारचा झाला चक्काचूर, परिसरात हळहळ

ट्रकच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू; कारचा झाला चक्काचूर, परिसरात हळहळ


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क गडचिरोली:आष्टी–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर चामोर्शी शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर एक भीषण अपघात झाला. यामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

गडचिरोलीत ट्रकने कारला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमीग्रस्त रूग्णावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातानंतर कारचा चेंदामेंदा झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी–गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर चामोर्शी शहरात भीषण अपघात घडला. कार राष्ट्रीय मार्गावरून जात असताना अचानक यू-टर्न घेतल्यामुळे मागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार अक्षरशः चेंदामेंदा झाली.

या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात विनोद पुंजाराम काटवे (वय वर्ष ४५), राजू सदाशिव नैताम (वय वर्ष ४५) आणि सुनील वैरागडे (वय वर्ष ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही गडचिरोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

तर, अनिल मारोती सातपुते (वय वर्ष ५०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चारही जण कारमधून कामानिमित्त आष्टीकडे जात होते. दरम्यान, कामावर पोहोचण्याआधीच त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना या अपघातासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून सध्या मालवाहू ट्रक चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या