धक्कादायक! कालपासून बेपत्ता असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत आढळला
गावात शोककळा; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
मूल (तालुका प्रतिनिधी): तालुक्यातील नांदगाव गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करण नरसिंग नवरत्ने (वय अंदाजे २०), हा कालपासून बेपत्ता असलेला महाविद्यालयीन विद्यार्थी, याचा मृतदेह आज दुपारी चारच्या सुमारास गावालगत असलेल्या विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
सकाळीच करण बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिस तपासाच्या दरम्यान गावालगतच्या विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ओळख पटविण्यात आला असून तो करण नवरत्नेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. करण हा हुशार आणि नम्र स्वभावाचा विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूमुळे मित्रमंडळी, कुटुंबीय व गावकरी सुन्न झाले आहेत.
करणने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस विविध अंगाने तपास करत आहेत.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी प्रशांत गायकवाड (मेजर) व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तपासाच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
पुढील तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading