हरियाणामधील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर मोठं नाव कमावलेल्या आणि विदेश दौऱ्यांमुळे चर्चेत राहिलेल्या मल्होत्राने पाकिस्तान, नेपाळ आणि चीनमध्ये वारंवार भेटी दिल्या होत्या. विशेष म्हणजे, ती अनेकदा चिनी दुतावासात दिसून येत होती आणि पाकिस्तानातही तिची नियमित वर्दळ होती.
या हालचालींमुळे RAW (रिसर्च अँड अॅनालिसिस विंग) आणि IB (इंटेलिजन्स ब्युरो) या केंद्रीय गुप्तचर संस्थांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर तिच्यावर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली आणि चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली – ज्योती मल्होत्राचे संबंध एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी होते.
अखेर तिची हेरगिरी स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तिला अटक केली. या कारवाईत तिच्यासोबत आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून, संबंधित पाकिस्तानी अधिकाऱ्याला देशाबाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला आहे.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. BJP आणि RSSशी संबंधित असलेल्या काही मंडळींवर आधीपासूनच परदेशी गुप्तचर यंत्रणांसोबत संबंध असल्याचे आरोप होत असताना, आता ज्योती मल्होत्रा हे नाव त्या यादीत नव्याने समाविष्ट झाले आहे.
देशद्रोहाच्या या प्रकारामुळे जनतेत संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर "आक थू" अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. सरकारकडून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून, अजून काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading