Advertisement

सीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ओबीसी गटातील संचालकपदासाठी चुरस वाढणार

सीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ओबीसी गटातील संचालकपदासाठी चुरस वाढणार


दरारा 24 तास न्युज नेटवर्क, चंद्रपूर

जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांचा समावेश असलेली ९०० मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (सीडीसीसी) निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तब्बल १३ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी २१ संचालक पदांवर निवडणूक होणार असून, यामध्ये ओबीसी गटातील संचालक पदांसाठी विशेष चुरस निर्माण झाली आहे.

बँकेच्या कारभाराबाबत अनेक वेळा चर्चा रंगल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात नोकरभरतीदरम्यान दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने निवडणुका सहा महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर सहकार विभागाने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली. एक सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्याने प्रारूप मतदार यादीविरोधात दाखल केलेल्या याचिकेमुळे यादीला स्थगिती मिळाली होती. मात्र आता ही स्थगिती उठवण्यात आल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ओबीसी गटात रंगतदार लढत होण्याची शक्यता

ओबीसी गटातून निवडणूक लढण्यासाठी प्रकाश देवतळे, श्यामकांत थेरे, दिनेश चोखारे यांची नावे आघाडीवर आहेत. या तिघांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, काही राजकीय नेते देखील या गटातून उमेदवारी देण्याचा विचार करत असल्याने चित्र अधिकच रोचक बनले आहे. त्यामुळे अनेक गट-तट एकत्र येण्याची शक्यता असून, सध्या विविध बैठका सुरू असल्याची माहिती आहे.
---
प्रमुख संभाव्य उमेदवार:


श्यामकांत थेरे


प्रकाश देवतळे


दिनेश चोखारे



-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या