Advertisement

पाऊस नाही, वारा नाही... तरीसुद्धा दोन तासांपासून जूनगावची वीज खंडित!



पाऊस नाही, वारा नाही... तरीसुद्धा दोन तासांपासून जूनगावची वीज खंडित!

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी

पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव परिसरातील नागरिक सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत. कोणताही पाऊस नाही, जोरदार वारा नाही, तरीदेखील गेले दोन तासांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

गावातील नागरिकांनी सांगितले की, नियमितपणे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास, शेतकऱ्यांचे पाण्याचे काम आणि व्यापाऱ्यांचे व्यवहार या सर्वांवर परिणाम होत आहे.

ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. इतक्या वेळ वीज गायब राहणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

"आम्हाला तरी कोणी उत्तर देणार का? दिवसा उकाडा आणि रात्री अंधार – यामुळे जगणंच मुश्किल झालं आहे," असे एका नागरिकाने बोलताना सांगितले.

या वारंवार होणाऱ्या विजेच्या समस्येकडे प्रशासन आणि वीज वितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या