Advertisement

शेतजमिनीच्या कामासाठी ४१ लाखांची मागणी; लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी अटकेत


शेतजमिनीच्या कामासाठी ४१ लाखांची मागणी; लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी अटकेत

छत्रपती संभाजीनगर | दरारा २४ तास न्यूज नेटवर्क
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या कारवाया सध्या गतीने सुरू असून, अनेक जिल्ह्यांतील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी अडकल्याचे समोर आले आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

येथील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी शेतजमिनीचा वर्ग (झोन) बदलण्यासाठी तब्बल ४१ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात त्यांच्यासह त्यांच्या स्विय सहाय्यकाला देखील अटक करण्यात आली आहे.

ACBच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार, लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, आणखी काही अधिकाऱ्यांची संलग्नता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या