आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनगाव येथे विशेष कार्यक्रम!
जुनगाव (जिल्हा चंद्रपूर), 24 तास न्युज नेटवर्क
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जुनगाव येथील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की 21 जून 2025 रोजी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी 7:30 वाजता शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केले आहे.
🗓️ महत्वाचे सूचना:
🔹 योग दिन कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी दप्तर आणू नये
🔹 रंगीत ड्रेस घालून शाळेत यावे
🔹 वेळेवर शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
📚 शैक्षणिक वर्षाची सुरुवात – 23 जूनपासून
तसेच पालक व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 23 जून 2025 पासून होणार आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना नियमितपणे शाळेत पाठवावे ही विनम्र विनंती.
🌟 आदेशानुसार:
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जुनगाव
मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक वृंद
0 टिप्पण्या
Thanks for reading