Advertisement

संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे पैसे लाभार्थ्यांना त्वरित द्यावेत – राहुल भाऊ पाल यांची मागणी



संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे पैसे लाभार्थ्यांना त्वरित द्यावेत – राहुल भाऊ पाल यांची मागणी



दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | पोंभूर्णा तालुका

पोंभूर्णा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेवृद्धापकाळ पेन्शन योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. यामुळे गरजू नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तसेच जूनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने लाभार्थ्यांना पेन्शनची रक्कम वितरित करण्याची जोरदार मागणी केली आहे.

राहुल भाऊ पाल म्हणाले की, "सरकार दरमहा पेन्शन रक्कम देण्यासाठी कटिबद्ध असली तरी स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे पूर्णपणे अन्यायकारक आहे."

ते पुढे म्हणाले की, "वृद्ध नागरिक, विधवा महिला व निराधार व्यक्तींना ही रक्कम जीवनावश्यक गरजांसाठी उपयोगी ठरते. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन पेन्शन वाटप सुनिश्चित करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल."

या मागणीमुळे स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या