🕯️ पित्रू शोक | समिर गौरकर यांच्यावर दुःखाचा डोंगर
पोंभुर्णा (प्रतिनिधी) – तालुक्यातील मोहाळा येथील सुप्रसिद्ध व सक्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते समिर गौरकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या वडिलांचे, बंडु गोसाई गौरकर (वय ४८ वर्षे) यांचे अकस्मात निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
स्व. बंडु गोसाई गौरकर हे मोहाळा परिसरात एक प्रामाणिक, सुसंस्कृत आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने परिसरातील समाजप्रिय व्यक्ती हरपली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि संपूर्ण कुटुंब असा मोठा परिवार आहे. विशेषतः समिर गौरकर यांना वडिलांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी ठरले होते. त्यांच्या सामाजिक कार्यामागे वडिलांचा मोलाचा हातभार होता.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावातील नागरिक, नातेवाईक व मित्रमंडळींनी गौरकर कुटुंबाच्या घरी भेट देत शोकसंवेदना व्यक्त केल्या.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क परिवारातर्फे स्व. बंडु गोसाई गौरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या परिवाराला या दु:खात सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना.
0 टिप्पण्या
Thanks for reading