Advertisement

शासकीय जागेवर बेकायदेशीर सोलर पॅनल? – विश्वराज इन्व्हायरोमेंट प्रा. लि. वर गंभीर आरोप





शासकीय जागेवर बेकायदेशीर सोलर पॅनल? – विश्वराज इन्व्हायरोमेंट प्रा. लि. वर गंभीर आरोप

चंद्रपूर | प्रतिनिधी - अर्चना उरकुडे
चंद्रपूर शहरातील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्र, पठाणपुरा येथे खाजगी कंपनी विश्वराज इन्व्हायरोमेंट प्रा. लि. ने शासकीय मालकीच्या जागेवर बेकायदेशीरपणे सोलर पॅनल बसवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे सादर केली आहे.

तक्रारीनुसार, महानगरपालिका आयुक्त श्री. विपीन पालेवार यांनी कथितरित्या संबंधित कंपनीकडून आर्थिक लाभ घेऊन ही परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय पदाचा गैरवापर झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

राजेश बेले यांनी आपल्या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत:

  1. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
  2. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.
  3. शासकीय जागेवरील अवैध सोलर पॅनल त्वरित हटवण्यात यावेत.
  4. भविष्यात अशी अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

तक्रारकर्त्यांनी ही तक्रार सार्वजनिक हिताच्या रक्षणाच्या दृष्टीने सादर केली असून, संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रतिलिपी या ठिकाणी पाठवण्यात आली आहे:

  • जिल्हाधिकारी, चंद्रपूर
  • आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या