प्रतिनिधी - दरारा 24 तास न्यूज नेटवर्क, पोभुर्णा
पोभुर्णा तालुक्यातील सातारा भोसले ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा – सातारा कोमटी गावात 10 जून 2025 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह पावसाने थैमान घातले. या वादळात गावातील Ro जलशुद्धीकरण संयंत्र पूर्णतः उडून गेले असून संयंत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर संपूर्ण गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्थानिक प्रशासन किंवा ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही तात्काळ मदत पोहोचलेली नाही, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Ro संयंत्र हे गावासाठी एकमेव शुद्ध पाण्याचा स्रोत होता. त्याच्या नष्ट झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडे मागणी केली असून, यावर लवकर उपाययोजना न झाल्यास आरोग्यसंकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading