Advertisement

जुनगावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील शिवरामजी पाल यांचे दुःखद निधन


जुनगावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील शिवरामजी पाल यांचे दुःखद निधन
उद्या सकाळी अकरा वाजता होणार अंत्यसंस्कार
प्रतिनिधी - जुनगाव, ता. पोभुर्णा

जुनगाव (ता. पोभुर्णा) येथील ज्येष्ठ व आदरणीय नागरिक तसेच गावचे माजी पोलीस पाटील शिवरामजी बेंडोजी पाटील पाल (वय ८२) यांचे आज दि. 21 रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

शिवरामजी पाल यांनी पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व गावातील सामाजिक सलोखा जपण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कामामुळे ते परिसरात आदर व प्रतिष्ठा प्राप्त केलेले व्यक्तिमत्व होते. गावातील विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग राहिला.

त्यांच्या निधनाने जुनगाव ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली असून गावाने एक जेष्ठ मार्गदर्शक गमावला आहे.

त्यांच्यावर उद्या, दि. 22 , सकाळी ११ वाजता जुनगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मृत्यूसमयी त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.

दरारा 24 तास न्यूज नेटवर्कतर्फे दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली आणि शोकाकुल कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना.


---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या