Advertisement

सियाचा वाढदिवस ठरला प्रेरणादायी : अनाथ बालिकेला शालेय किट भेट देत साजरा केला वाढदिवस

 


👩‍🦰सियाचा वाढदिवस ठरला प्रेरणादायी : अनाथ बालिकेला शालेय किट भेट देत साजरा केला वाढदिवस

पोंभुर्णा / उमरी पोतदार :
वाढदिवस म्हणजे केक, फुगे, गिफ्ट्स आणि सेलिब्रेशन... पण यावर्षी उमरी पोतदार गावातील एका चिमुकलीने वाढदिवसाचा अर्थच बदलून टाकला. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय सिया मंगेश उपरे हिने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक अनोखा आणि भावनिक उपक्रम राबवला.

सियाने गावातीलच एका अनाथ बालिकेला शालेय साहित्याचे किट भेट दिले. संबंधित बालिकेचे आई-वडील काळाच्या पडद्यामागे गेल्यानंतर तिचे संगोपन तिची म्हातारी आजी करत आहे. अनेक दिवसांपासून त्या मुलीबद्दल मनात आपुलकी आणि प्रेम निर्माण झाल्यामुळे सियाने आपला वाढदिवस काहीसा हटके पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

या उपक्रमामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. आजच्या स्पर्धात्मक युगात एका लहान मुलीच्या मनात दुसऱ्यासाठी एवढी जाणीव आणि सामाजिक बांधिलकी असणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

वाढदिवसाच्या कार्यक्रमास सियाचे आई-वडील आम्रपाली उपरे व मंगेश उपरे, शाळेतील शिक्षक गव्हारे सर, कोवे सर, कावरे सर, तसेच इतर विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. शाळेतील बालगोपाळांसह हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने पण प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क कडून सियाच्या या सुंदर उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या