🛣️ नांदगाव घोसरी ते देवाडा बुज रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य — ठेकेदारांच्या बेफिकीरीने वाढतोय अपघाताचा धोका!
नांदगाव भोसरी ते देवाडा बुज या मुख्य मार्गावरील डांबरी रस्ता सध्या अक्षरशः चिखलामध्ये हरवला आहे. गोसेखुर्द धरण प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकताना ठेकेदारांनी रस्ता अनेक ठिकाणी फोडला. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर तो पूर्ववत केलाच नाही. माती टाकून उरकलं गेलेलं काम आता पावसाळ्यात चिखलात रूपांतरित झालं असून, वाहनधारक व पादचाऱ्यांसाठी अपघाताचे संकट निर्माण झाले आहे.
या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असूनही त्यांनी डोळेझाक केली आहे. नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी करूनही विभागाचा दृष्टिकोन निष्क्रीय आणि दुर्लक्ष करणारा आहे.
ठेकेदाराच्या बेपर्वाईचा बळी — पोलीस पाटील यांचा मृत्यू
या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे जुनगावचे पोलीस पाटील कान्होजी पाटील भाकरे यांचा अपघातात मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे त्यांच्या कुटुंबाला आजतागायत कोणतीही आर्थिक मदत ठेकेदार किंवा विभागाकडून मिळालेली नाही.
ग्रामस्थ आक्रमक — आंदोलनाची चेतावणी
या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला असून, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष व जूनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी इशारा दिला आहे की,
"जर संबंधित विभाग व ठेकेदारांनी याकडे तात्काळ लक्ष दिलं नाही, तर जनआंदोलन उभारून ठेकेदारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल."
हिंदी भाषिक ठेकेदारांची मस्ती चढली
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या कामावर असलेले बहुतांश हिंदी भाषिक ठेकेदार मस्तावलेले असून, स्थानिकांच्या तक्रारींकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या या मस्तीला लगाम घालण्याची वेळ आता आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
📰 प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज बुलंद करा — जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जाणे हीच खरी लोकशाही!
0 टिप्पण्या
Thanks for reading