Advertisement

मुल तालुक्यातील बाबराळा येथील शेतकऱ्यांची मागणी – बसस्टॉपजवळील काम अपूर्ण, लाल मुरूम टाकण्याची गरज


मुल तालुक्यातील बाबराळा येथील शेतकऱ्यांची मागणी – बसस्टॉपजवळील काम अपूर्ण, लाल मुरूम टाकण्याची गरज

मुल (जि. चंद्रपूर) – मौजा बाबराळा येथील बसस्टॉपपासून खनिजकर्म योजनेतून काक्रिंट करणाचे काम दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र, या कामादरम्यान साईड बंपरवर विहीरीची भिसी भरण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत आवाज उठवला असून लाल मुरूम टाकण्यात यावा, अशी मागणी केली आहे. सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या बंड्या आणि गाड्या रस्त्यावरून सहजपणे नेणे अशक्य झाले असून, शेतीकामात अडथळे निर्माण होत आहेत.

नागरिकांचे म्हणणे आहे की दोन महिने उलटूनही या कामाची दखल संबंधित विभागाने घेतलेली नाही. त्यामुळे शासन आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन साईड बंपरवर लाल मुरूम टाकण्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

📰 दरारा 24 तास न्युज नेटवर्क



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या