Advertisement

पोंभुर्णा तहसील कार्यालयात महसूल सप्ताह – आखीव पत्रिका वितरण, संजय गांधी निराधार योजना शिबिर व अतिक्रमण निर्मूलन मोहीम


🌟 पोंभुर्णा तहसील कार्यालयात महसूल सप्ताह – आखीव पत्रिका वितरण, संजय गांधी निराधार योजना शिबिर व अतिक्रमण निर्मूलन मोहीम

पोंभुर्णा (ता.प्र.) – महसूल विभागाच्यावतीने महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये आखीव पत्रिका वितरण, संजय गांधी निराधार योजना शिबिर आणि अतिक्रमण निर्मूलन मोहीम यांचा समावेश आहे.

🕳️ आखीव पत्रिका वितरण व संजय गांधी निराधार योजना शिबिर
दिनांक ५ ऑगस्ट २०२५, रोजी सकाळी १०:३० वाजता, तहसील कार्यालय, पोंभुर्णा येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना आखीव पत्रिका वाटप करण्यात येणार असून, या पत्रिकेमुळे जमीन मालकी हक्काचा अधिकृत दस्तऐवज उपलब्ध होईल. हा दस्तऐवज कर्ज सुविधा, घरकुल, शासकीय योजना, शालेय दाखले, जात प्रमाणपत्र, पाणीपुरवठा योजना व अन्य महत्त्वाच्या कामांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

संजय गांधी निराधार योजना शिबिरात नवीन अर्ज स्वीकारणे, प्रलंबित प्रकरणांची छाननी तसेच डीबीटी अनुदान न मिळालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. तहसील प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ग्रामसेवक, कोतवाल व पंचायत सचिवांच्या माध्यमातून ग्रामसभा, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि नोटीस बोर्डाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

🪐 स्थळ: तहसील कार्यालय सभागृह, पोंभुर्णा
🕥 वेळ: सकाळी १०:३० वाजता

🌑 अतिक्रमण निर्मूलन मोहीम – ६ ऑगस्ट
महसूल सप्ताहाच्या सहाव्या दिवशी, दिनांक ६ ऑगस्ट २०२५, महसूल विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे. महसूल यंत्रणा थेट बांधावर उतरून अडविलेले रस्ते आणि पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील नागरी व कृषी वाहतूक मार्ग मोकळे होतील, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडथळाविना दळणवळण करता येईल.

महसूल विभागाने नागरिकांना या मोहिमेमध्ये सहकार्य करण्याचे तसेच सप्ताहातील उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या