पोंभूर्ण्यात आज समाधान शिबिर | नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा एकाच छताखाली
पोंभूर्णा (ता.प्र.) – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानांतर्गत पोंभूर्णा तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय योजना व सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात संजय गांधी निराधार योजना अर्ज स्वीकृती व मार्गदर्शन, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व पात्रता तपासणी, पीएम किसान सन्मान निधी योजना नवीन नोंदणी, आधार लिंकिंग व तक्रार निवारण, पिक विमा योजना अर्ज व नुकसान भरपाई संदर्भातील माहिती, पोस्ट ऑफिस सेवा, अॅग्रेसटेक स्टॉल सुविधा, आधार कार्ड अपडेट सुविधा यांचा समावेश आहे.
तसेच नवीन मतदार नोंदणी, पत्ता/नाव/मोबाईल क्रमांक दुरुस्ती, बायोमेट्रिक अपडेट, ईपीआयसी सुधारणा व पुनर्मुद्रण सेवा, रेशन कार्ड सेवा (समावेश, वगळणे, दुरुस्ती, तक्रारी निवारण) तसेच महसूल विभाग स्टॉलमार्फत रहिवाशी, उत्पन्न, जाती, नॉन क्रिमिलेअर व वारसा प्रमाणपत्र वाटपाची सुविधा दिली जाणार आहे.
तहसीलदार मोहनिष शेलवटकर यांनी नागरिकांना या समाधान शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading