👍
जिल्हा भोई-ढीवर, केवट व तत्सम समाज बांधवांना न्यायहक्कासाठी तहसीलदारांना निवेदन देण्याचे आवाहन
✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चामोर्शी : सुखसागर एम झाडे
जिल्हा भोई, ढीवर, केवट व तत्सम समाज बांधवांनी आपल्या न्यायहक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका चामोर्शीचे कार्याध्यक्ष हरिष गेडाम यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने गट (क), गट (ड) व गट-ड मधील पदभरतीसंदर्भात भटक्या जमाती (ब) वर्गाला असलेले २.५ टक्के आरक्षण आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांपैकी फक्त गडचिरोली जिल्ह्यात कमी करून दिल्याने झालेला अन्याय दूर करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदार चामोर्शी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.
📌 कार्यक्रमाचे वेळापत्रक
- दिनांक : सोमवार, १ सप्टेंबर २०२५
- वेळ : दुपारी १२.०० वाजता
- स्थळ : तहसील कार्यालय, चामोर्शी – निवेदन सादरीकरण
- त्यानंतर दुपारी १.३० वाजता कार्यकारिणीची सभा सांस्कृतिक भवन, महर्षी वाल्मिकी चौक, केवट मोहल्ला, चामोर्शी येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत चर्चा होऊन योग्य ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
कार्याध्यक्ष हरिष गेडाम यांनी समाज बांधवांना या दोन्ही कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading