👍 दरारा 24 तास
जिल्हाधिकारी अविश्रांत पंडा यांचा इशारा – सिरोंचा व भामरागडमध्ये संभाव्य पूरस्थिती
✍️ सुखसागर एम. झाडे
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
तेलंगणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्याचा परिणाम थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
जिल्हाधिकारी अविश्रांत पंडा यांनी आज तातडीची आढावा बैठक घेऊन महसूल, पोलीस, आरोग्य व इतर विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले. नागरिकांचे स्थलांतर, आरोग्य सुविधा उपलब्धता आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यरत ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
➡️ ८ ते १० लाख क्युसेक पाणी आज रात्री १० ते ११ वाजेदरम्यान सिरोंचा तालुक्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना मोठा धोका संभवतो.
जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या सूचना :
🔸 नागरिकांचे स्थलांतर – सिरोंचा व भामरागड तालुक्यातील नदीकाठी राहणाऱ्या गावांमध्ये दवंडी देऊन लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश तहसीलदारांना.
🔸 एसडीआरएफ पथके तैनात – पूरस्थिती हाताळण्यासाठी एसडीआरएफ पथके तातडीने सज्ज ठेवण्यात येणार.
🔸 शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचा पर्याय – नदी ओलांडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यकतेनुसार सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना.
🔸 अफवांवर नियंत्रण – रात्रीच्या वेळी पाण्याचा विसर्ग होत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरू नये, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क राहणार.
🔸 आरोग्य सुविधा सज्ज – पूरानंतर संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी पुरेसा ब्लिचिंग पावडर आणि औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी भामरागड तालुक्यातील इंद्रावती नदीची पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त करून नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
👉
0 टिप्पण्या
Thanks for reading