Advertisement

गडचिरोली पोलिसांचा अभिमान – पोउपनि. वासुदेव मडावी यांचा गौरव




गडचिरोली पोलिसांचा अभिमान – पोउपनि. वासुदेव मडावी यांचा गौरव

✍️ सुखसागर एम. झाडे
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

गडचिरोली :
गडचिरोली पोलीस दलातील पार्टी कमांडर पोउपनि. वासुदेव राजम मडावी यांनी माओवादीविरोधी लढाईत दाखवलेल्या असामान्य शौर्य, पराक्रम आणि नेतृत्वाबद्दल आज त्यांचा गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पोउपनि. वासुदेव मडावी यांची कामगिरी ✨

  • 26 वर्षांची निष्ठावंत सेवा (1998 पासून)
  • 58 चकमकींमध्ये थेट सहभाग
  • 101 माओवादी कंठस्नान
  • 05 जहाल माओवादी अटक
  • 03 वेगवर्धीत पदोन्नती
  • पोलीस शौर्य पदक
  • असाधारण आसूचना कुशलता पदक
  • पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

महत्त्वाच्या चकमकींमध्ये योगदान 🔥

  • बोरीया कसनासूर : 40 माओवादी कंठस्नान
  • गोविंदगाव : 06 माओवादी कंठस्नान
  • मर्दिनटोला : 27 माओवादी कंठस्नान
  • कोपर्शी-कोढूर : 05 माओवादी कंठस्नान
  • कतरंगट्टा : 03 माओवादी कंठस्नान
  • कोपर्शी : 04 माओवादी कंठस्नान

गडचिरोली पोलिस दलाला पोउपनि. वासुदेव मडावी यांच्यासारखे धाडसी आणि समर्पित जवान लाभणे ही खरी ताकद आहे. त्यांच्या शौर्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी मोलाचे योगदान मिळाले आहे.

अशाच पराक्रमी जवानांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे आज गडचिरोली अधिक सुरक्षित आणि शांततामय बनत आहे.


👉 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या