‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत एस.पी.के. महिला महाविद्यालयाची रॅली व स्वच्छता मोहीम
✍️ सुखसागर एम. झाडे
चामोर्शी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार २ ते १५ ऑगस्ट दरम्यान "घराघरी तिरंगा" मोहीम राबविली जात आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने, या अभियानाचा एक भाग म्हणून शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय, चामोर्शीच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी रॅली व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालय परिसरातून निघालेली रॅली चामोर्शी शहरातील प्रमुख मार्गांवर फिरली. या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी तिरंग्याचे महत्त्व, स्वच्छतेचे संदेश देत घोषवाक्ये दिली. त्यानंतर महाविद्यालय व शहर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्या कू. एस.आर. काशट्टीवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. एन.आर. झाडे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. धनंजय यादव, डॉ. भगवान धोटे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीरा वाघमारे, आय.क्यू.ए.सी. प्रमुख प्रा. कृणाल अंबोरकर, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. नितेश सावसाखडे, शिष्यवृत्ती समन्वयक प्रा. दगडू पांडुरंग गुडधे तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
देशभक्ती व स्वच्छतेचा संदेश देत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
0 टिप्पण्या
Thanks for reading